पुणे :- तरूणी राहत्या घरी झोपलेली असताना तिचे न्युड फोटो आणि व्हिडीओ काढून ते तिच्या घरच्यांना तसेच बॉयफ्रेडला आणि सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देवुन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी तरूणाविरूध्द स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सौरभ सुभाषचंद्र गुप्ता (30, रा. सी.जी.एच.एस. शासकिय क्वॉटर्स, मुकुंदनगर, पुणे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत तरूणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत तरूणी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने सप्टेंबर 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान पिडीत तरूणी घरी झोपलेली असताना तिचे न्युड फोटो आणि व्हिडीओ काढले. ते तिच्या घरच्यांना, बॉयफ्रेडला तसेच सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी तरूणीला देवून तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध ठेवले. आरोपीने फिर्यादीच्या व त्याच्या राहत्या फ्लॅटवर तरूणीस हाताने मारहाण केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ