लग्न समारंभातच नवरदेव नवरी यांच्यात मिठाई वरून झालं कडाक्याचं भांडण, 7फेरे घेतल्यानंतर लगेच मोडलं लग्न

Spread the love

रेवाडी :- लग्न म्हटल्यावर विविध प्रथा परंपरा, हौसमौज आणि जेवणाची मस्त मेजवानी असतेच. प्रत्येक लग्नात आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य केले जाते. लग्नामध्ये पंचपकवान बनवले जातात.आता लग्नामध्ये घरातील आत्या किंवा मोठे जावई मानपान नीट न मिळाल्याने नाराज असल्याचे तुम्ही ऐकले असेल. या व्यक्तींमध्ये भांडण झालेलं देखील पाहिलं असेल. मात्र जेवणावरून नवरा आणि नवरीमध्ये भांडण झाल्याचं कधी ऐकलंय का?हरियाणामधील रेवडी येथे लग्न समारंभात पती पत्नीमध्ये जेवनावरून कडाक्याचं भांडण झालं आहे.

लग्नामध्ये विविध पदार्थ जेवणासाठी बनवण्यात आले होते. मिठाईमध्ये गाजराचा हलवा बनवण्यात आला होता. मात्र नवरीला गाजराचा हलवा आवडला नाही. तिने नवरदेवाला काजुकतली पाहिजे असल्याचे सांगितले.गाजराचा हलवा आणि काजुकतली यामुळेच दोघांमध्ये मोठी भांडणे सुरू झाली. नवरीने सांगितले की तिला मिठाईमध्ये गाजराचा हलवा नको तिला काजुकतली पाहिजे. यावर नवरदेवाने तिला अपमानास्पद वागणूक दिली. तसेच वाद आणि भांडणे केली. एवढेच नाही तर लग्नाचे 7 फेरे घेऊन झालेले असताना देखील त्याने नवरीला आपल्याबरोबर घेऊन जाण्यास नकार दिला.

नवरदेव नवरीला म्हणाला की, तू माझी पत्नी आहेस त्यामुळे मी सांगेल ते तुला ऐकावं लागेल. तसेही तुझी काय व्हॅल्यू आहे जे तुझी आवड मी लक्षात ठेवावी. मी इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतलं आहे. तुझं माझ्याएवढं शिक्षण देखील झालेलं नाही. त्यामुळे तुझी आवड निवड पाहायला आम्हाला वेळ नाही. या सर्व गोष्टी नवरीला फार वाईट वाटल्या. तिने आपल्या पतीला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.

यावर नवऱ्याने तिला विचारले की, काही दिवसांनी माझे आई वडील म्हातारे होतील त्यावेळी त्यांची बरीच कामे तुला करावी लागतील. त्यांच्यासाठी मी एखादा पाळीव प्राणी घेतला तर त्याची देखरेख तुला ठेवावी लागेल हे तुला मान्य आहे का? असे प्रश्न विचारले. पतीच्या या प्रश्नांना पत्नीने नाही असं उत्तर दिलं. यावर त्याने मला हे लग्न मान्य नसल्याचं म्हटलं. तसेच पुन्हा पत्नीला आपल्यासोबत घेऊन जाण्यास नकार दिला. पत्नीने या बाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच पतीला योग्य ती शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार