या लग्नाची देशभरात चर्चा! गँगस्टर व लेडी डॉन यांनी मोठ्या पोलीस बंदोबस्तात बांधली एकमेकांशी लग्नगाठ.

Spread the love

दिल्ली:- कुख्यात गँगस्टर संदीप उर्फ काला जठेडी आणि लेडी डॉन अनुराधा चौधरी उर्फ मॅडम मिंज हे लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांनी दिल्लीतील द्वारका येथील संतोष गार्डन येथे एकमेकांशी लग्नगाठ बांधली. या लग्नाला मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा होता. संदीपला लग्नासाठी फक्त सकाळी 10 ते संध्याकाळी चार पर्यंतचा पॅऱोल न्यायालयाने दिल्याने लग्नानंतर लगेच त्याला पोलिसांनी पुन्हा तिहार तुरुंगात नेले.

गँगस्टर संदीप व लेडी डॉन अनुराधा यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू आहे. ते दोघेही वेगवेगळ्या प्रकरणात फरार असतानाच त्यांची भेट झाली. संदीपवर चाळीस हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर अनुराधावर 19 गुन्हे दाखल आहेत. संदीप व अनुराधा फरार असतानाच त्यांनी हरिद्वार येथे गुपचूप लग्न केले होते. मात्र आपल्या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी त्यांनी सर्व विधीवत लग्न करायचे ठरवले.

अनुराधा ही जामिनावर सध्या तुरुंगाबाहेर आहे. तिच संधी साधत संदीपने लग्नासाठी पॅऱोलसाठी अर्ज केला होता. त्यानुसार संदीपला 12 मार्च ला लग्नासाठी सहा तासांचा पॅरोल मंजूर झाला. त्या दरम्यान संदीप व अनुराधा लग्नबंधनात अडकले.

दीडशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा

या लग्नासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दीडशेहून अधिक पोलीस तिथे तैनात होते. आलेल्या प्रत्येक पाहुण्याची तपासणी केली जात होती. तसेच दोन स्कॅनिग मशीन देखील बसवण्यात आल्या होत्या.

हे पण वाचा

टीम झुंजार