जमिनीच्या वादातून एसबीएसपीच्या प्रदेश महासचिव नंदिनी राजभर यांची घरातच हत्या;अनेक दिवसापासून येत होती धमकी.

Spread the love

नवी दिल्ली- सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच्या महिला शाखेच्या प्रदेश महासचिव नंदिनी राजभर (वय ३०) यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या घरात त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा आढळून आला आहे.गेल्या काही दिवसांपासून त्यांना धमकी मिळत होत्या असं सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेशच्या संतकबीरनगरमधील ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच एएसपी, सीओ यासह इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. डिघा गावात राहणाऱ्या नंदिनी सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (सुभासपा) च्या महिला शाखेच्या प्रदेश महासचिव होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी त्या जिल्हा स्टेडियममध्ये आरएसएसकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर दुपारी दोन वाजता त्या घराकडे रवाना झाल्या होत्या.नंदिनी यांच्या सासू आरती देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चार वाजता त्या जेव्हा घरी पोहोचल्या तेव्हा त्यांना दरवाजा उघडा आढलला. त्यानंतर आरती देवींनी नंदिनी यांना आवाज दिला, पण त्यांना उत्तर मिळालं नाही. घरात दुसरं कोणी नव्हतं. एका खोलीत त्यांना नंदिनी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं आढळल्या.

त्यानंतर आरती देवींनी यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली.कुटुंबियांनी सांगितलं की, नंदिनी यांना काही दिवसांपासून धमकी मिळत होती. यामुळे त्या तणावात होत्या. धमकी कोणाकडून मिळत होती हे अद्याप कळू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळतात पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. फॉरेन्सिकची टीम देखील घटनास्थळी आली आहे. हत्येमुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशयपोलीस अधिकारी कृष्ण भारद्वाज यांनी सांगितलं की, नंदिनी राजभर यांच्यावर चाकू हल्ला करुन हत्या करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे. प्राथमिक तपासानुसार जमिनीच्या वादातून ही हत्या झाली आहे. १० दिवसांपूर्वीच जमिनीवरुन वाद झाला होता. त्यावेळी काही कारवाई झाली नव्हती. निष्काळजीपणा दाखवलेल्या पोलिसांवर देखील कारवाई करण्यात येईल.

हे पण वाचा

टीम झुंजार