मुलगी घरी न दिसल्याने चिडलेल्या हैवान बापाने 16 वर्षीय मुलीस केली बेदममारहाण नंतर मृतदेह पुरला जमिनीत ‘असा’ झाला घटनेचा खुलासा.

Spread the love

पलामू (झारखंड):- बाप म्हणजे घराचा आधार, एक वटवृक्ष, ज्याच्या सावलीत संपूर्ण कुटुंब सुरक्षित असते.पण तोच बाप जेव्हा हैवान बनतो, तेव्हा अनर्थ होतो, अशीच एक घटना झारखंडच्या पलामू जिल्ह्यात घडलीय. या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केलाय. आपल्या पोटच्या लेकीचा खून करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचे वडील असल्याचे निष्पन्न झाले. ज्यामुळे तो बाप नाही तर एक हैवान असल्याचं समोर आलंय. या बापाने लेकीला बेदम मारहाण करून हत्या केली. नंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी काही लोकांना सोबत घेऊन तिचा मृतदेह जमिनीत गाडला. मात्र तीन दिवसांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत चार जणांना अटक केली. मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

आपल्या मुलीला एवढी मारहाण केली की…

पलामू जिल्ह्यात सुमारे तीन दिवसांपूर्वी जमिनीत गाडलेल्या 16 वर्षीय मुलीचा मृतदेह पोलिसांनी शुक्रवारी जमिनीतून बाहेर काढला. ही घटना रांचीपासून 175 किलोमीटर अंतरावर असलेल्या चैनपूर पोलिस स्टेशन परिसरात घडली. सलतुआ गावात एका व्यक्तीने आपल्या मुलीला एवढी मारहाण केली की तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती देताना पलामूच्या पोलीस अधीक्षक रेश्मा रामसन यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, मुलीचा मृतदेह दोन ते तीन दिवस जुना दिसत आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मेदिनीराय मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (MMCH) पाठवण्यात आला. जिथे मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.

मुलगी घरी न दिसल्याने आरोपी चिडला, आणि मग...

एसपी रामसेन यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस अजूनही मुलीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींनी या निघृण गुन्ह्यासाठी अल्पवयीन मुलीच्या वडिलांना जबाबदार धरलंय. आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी आपली मुलगी घरी न दिसल्याने आरोपी चिडला होता. ती घरी परतल्यावर तो तिच्याशी भांडू लागला. दरम्यान, दारूच्या नशेत असलेल्या वडिलांनी आपल्या मुलीला एवढी मारहाण केली की, तिचा मृत्यू झाला. यानंतर काही ग्रामस्थांच्या मदतीने या बापाने आपल्या मुलीचा मृतदेह पुरला.

पोलिसांची दिशाभूल करत होता बाप!

गुरूवारी मध्य प्रदेशातील छतरपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली होती. येथे एका बापाने आपल्याच मुलीची हत्या केली. आपला गुन्हा लपवण्यासाठी खुनी पित्याने आधी आपल्या मुलीचा मृतदेह पोत्यात बांधून जंगलात नेऊन विहिरीत फेकून दिला आणि नंतर पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तो प्रत्येक टप्प्यावर पोलिसांची दिशाभूल करत होता पण अखेर त्याचा गुन्हा उघडकीस आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली होती.

हे पण वाचा

टीम झुंजार