खरगोन (मध्य प्रदेश) :-‘साहेब, माझी काय चूक आहे? कोणावर प्रेम करण गुन्हा आहे का? समोरच्याने माझ्याशी लग्न केलं, तर त्याने मला त्याच्या घरी ठेवलं पाहिजे. पण तो मला हॉटेल सोडून पळाला’ हे बोलत असतानाच 19 वर्षाच्या मुलीला पोलीस अधीक्षकांसमोरच रडू कोसळलं. तिथे उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कसंबस तिला शांत केलं व आरोपी विरोधात तक्रार नोंदवली.एसपी समोर तक्रार नोंदवण्यासाठी आलेली 19 वर्षांची मुलगी मागच्यावर्षी 26 जूनला विक्रम सोलंकीच्या संपर्कात आलेली. विक्रम खरगोन जिल्ह्याच्या बफलगावमध्ये राहतो. 6 महिने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर विक्रम आणि या मुलीने 17 जानेवारीला आर्य मंदिरात लग्न केलं.
मुलगी कशीबशी पोलीस ठाण्यात पोहोचली
लग्नानंतर विक्रम मुलीला घरी घेऊन गेला नाही. त्याने तिला इंदूरच्या एका हॉटेलमध्ये ठेवलं होतं. मुलगी घरी नेण्यासाठी त्याच्या मागे लागली, तेव्हा त्याने मारहाण केली. तिला हॉटेलमध्ये सोडून तो पळाला. मुलगी कशीबशी बडवाह पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने आपला अनुभव सांगितला. अखिल भारतीय बलाई महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली.
जिल्ह्याच्या एसपीला करावा लागला हस्तक्षेप
जाती संघटनेचे लोक पीडितेसोबत पोलीस ठाण्यात पोहोचले. पण पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही. त्यानंतर पीडित युवती खरगोनचे एसपी धर्मवीर सिंह यांच्याजवळ गेली. एसपीच्या हस्तक्षेपानंतर बडवाह पोलीस ठाण्यात आरोपी विक्रम सोलंकी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.