Viral Video: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एक महिला एका पुरुषाला कानाखाली मारताना दिसत आहे. तसेच या व्यक्तीला मारल्यानंतर ती दुसऱ्या एका महिलेवर हल्ला करतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या X यूजरने शेअर केला आहे . पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, घटनेचे नेमके ठिकाण निश्चित नाही.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, एका पत्नीला तिच्या पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल माहिती मिळाली आणि तिने एका शॉपिंग मॉलमध्ये दोघांचा समाचार घेतला.व्हिडिओमध्ये पत्नी पहिल्यांदा पतीला कानाखाली मारते, तिची पडलेली बॅग उचलते आणि निघून जाताना पतीची बरोबर असलेल्या दुसऱ्या महिलेचे केस ओढत खाली पाडते आणि निघून जाते. नंतर तो पुरुष हल्ला झालेल्या महिलेला उठण्यास मदत करत असल्याचे दिसत आहे.
पती-पत्नीच्या वादाजे मजेशीर प्रकरण
दरम्यान उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातही पती-पत्नीच्या वादाचे एक मजेदार प्रकरण समोर आले आहे. पती-पत्नीमध्ये हा वाद मोमोजवरून झाला आहे. पती कामाहून घरी परत येताना मोमोज आणत नसल्याने पत्नीने पतीला घटस्फोट देण्यासाठी पोलिसांत तक्रार केली. एवढेच नाही तर संतापलेली पत्नी माहेरी निघून आली होती. हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पोहोचल्यावर पती-पत्नी दोघांनाही बोलावण्यात आले. कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पत्नीने जे सांगितले ते ऐकून तेथे उपस्थित असलेले पोलीस कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. मात्र, नंतर पती-पत्नीमध्ये तडजोड झाली.
पती-पत्नीच्या वादाजे मजेशीर प्रकरण
दरम्यान उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातही पती-पत्नीच्या वादाचे एक मजेदार प्रकरण समोर आले आहे. पती-पत्नीमध्ये हा वाद मोमोजवरून झाला आहे. पती कामाहून घरी परत येताना मोमोज आणत नसल्याने पत्नीने पतीला घटस्फोट देण्यासाठी पोलिसांत तक्रार केली. एवढेच नाही तर संतापलेली पत्नी माहेरी निघून आली होती.हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पोहोचल्यावर पती-पत्नी दोघांनाही बोलावण्यात आले. कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पत्नीने जे सांगितले ते ऐकून तेथे उपस्थित असलेले पोलीस कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. मात्र, नंतर पती-पत्नीमध्ये तडजोड झाली.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






