आजच्या दिवस कसा जाणार याचं कुहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते.जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजच्या दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:
दिवस प्रतिकूल असेल. सामाजिक स्तरावर नवीन लोकांशी ओळखी होतील. पण व्देष आणि न्यूनगंडामुळे या ओळखीचा फार फायदा होणार नाही. आरोग्यात चढ-उतार दिसतील. रक्त, पित्त किंवा गॅसेसचा त्रास जाणवेल.कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत अचानक बिघडल्याने पैसे खर्च होतील. घरातील आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाची कामं आर्थिक कारणांमुळे प्रलंबित राहतील. जुन्या प्रियकर-प्रेयसीला भेटून आनंद वाटेल.
वृषभ:
दिवसाच्या पूर्वार्धात समस्या जास्त जाणवतील. अनपेक्षित कामामुळे पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करावा लागेल. कार्यक्षेत्रात स्पर्धकांचे वर्चस्व राहील. त्यामुळे व्यवसाय विस्ताराच्या योजना रखडतील. दुपारपर्यंत पैसे मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. धार्मिक गोष्टींवरील श्रद्धा जागृत झाल्याने मानसिक शांती मिळेल. अचानक आर्थिक लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण शांत असेल पण अचानक प्रतिकूल गोष्टींमुळे थोडी अस्वस्थता जाणवेल.
मिथुन:
घर आणि व्यवसायात संतुलन ठेवताना द्विधा मनस्थिती असेल. एखादं काम पूर्ण करण्यात वेळ गेल्याने इतर महत्त्वाची कामं अपूर्ण राहू शकतात. आळस जास्त जाणवेल. त्यामुळे तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.. मनात चंचलपणा असल्याने तसेच निर्णयक्षमता नसल्याने लाभ मिळू शकणार नाही. आर्थिक कारणावरून घरातल्या महिला किंवा इतर सदस्यांशी वाद होऊ शकतात. दुपारी शारीरिक थकवा जाणवेल त्यामुळे थोडी विश्रांती घ्या. घरातील स्थितीमुळे महिला चिंतेत राहतील.
कर्क :
आज तुमचा आश्वासनांवर भर असेल. महत्त्वाच्या कामासाठी एखाद्या व्यक्तीच्या निर्णयासाठी वाट पाहावी लागेल. नोकरदार व्यक्ती कामाच्या ताणामुळे अस्वस्थ राहतील. व्यावसायिकांनी दुपारपर्यंत उदासीनता जाणवेल. दुपारचा वेळ चांगला जाईल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. व्यवसायात विक्री वाढेल. पैसा येऊ लागल्याने अपूर्ण कामं वेळेत पूर्ण होतील. महिलांचे विचार सारखे बदलतील. जेष्ठ किंवा मोठ्या व्यक्तींकडून स्वार्थ साधून घ्याल.
सिंह:
आज तुम्ही आध्यात्मिक गोष्टींमध्ये मग्न राहाल. दानधर्म कराल. सामाजिक वर्तुळ विस्तारेल. त्यामुळे भविष्यात फायदा होईल. व्यावसायिकांना कामात उदासीनता जाणवेल. दिवसाच्या सुरुवातीचा काळ थोडा त्रासदायक जाईल. त्यानंतर संपत्ती आणि सन्मान वाढेल. विरोधक प्रबळ होतील. कोणाशी तरी विनाकारण वाद होतील. वडिलोपार्जित कामाकडे दुर्लक्ष झाले तरी तुम्हाला त्यातून काही फायदा मिळेल. महिलांना एखाद्या घटनेचा हेवा वाटेल.
कन्या:
दिवस यशदायी असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले रिझल्ट मिळतील. अपूर्ण कामं पूर्ण झाल्यानं व्यावसायिक व्यक्ती समाधानी असतील. कार्यक्षेत्रात एखाद्या व्यक्तीमुळे वातावरण गरम होऊ शकते. त्यामुळे काही काळ कामावर परिणाम होईल. नवीन सौदे, करारासाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. पैशाशी संबंधित समस्या कमी प्रमाणात जाणवतील. घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा महिला विनाकारण नाराज होतील.
तूळ:
दिवस थोडा अशांत असेल. एखाद्या व्यक्तीच्या मनमानी स्वभावामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस शुभ आहे. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळाल्याने तुम्हाला समाधान वाटेल. घरातील आणि बाहेरचे लोक तुमच्या बौद्धिक क्षमतेची प्रशंसा करतील. काही गैरसमजामुळे घरात अशांतता राहू शकते. महिलांना चांगली बातमी मिळाल्याने आनंद वाटेल. पण काही कारणांमुळे मानसिक तणाव कायम राहील.
वृश्चिक:
दिवस सामान्य असेल. कौटुंबिक संबंध जपण्याचा प्रयत्न करा. अचूक विचार आणि समजूतदार कार्यपद्धतीमुळे परस्पर वाद टळू शकतात पण एखाद्या व्यक्तीने अतिरेक केल्यास तुमचा संयम सुटेल. याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे धीर कायम ठेवा. सरकारी किंवा मालमत्तेशी संबंधित कोणत्याही कामामुळे तुम्ही अडकून पडाल. त्यामुळे अशी कामं शक्यतो टाळा. आध्यात्मिक कार्यात सहभाग घेतल्याने थोडी मानसिक शांती मिळेल. पैशांच्या बाबतीत स्वतःवर जबरदस्ती टाळा. मुलांना जास्त मोकळीक देऊ नका.
धनु:
दिवस व्यस्तता वाढवणारा असेल. कामाकडं दुर्लक्ष झाल्याने लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागेल. तुमच्या योजना अपूर्ण राहू शकतात. घरातील कामामुळे व्यावसायिक कामास विलंब होईल. एखादं काम घाईत केल्यास नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही. नवीन कामाला सुरुवात किंवा व्यवसाय विस्ताराच्या योजना तूर्तास पुढं ढकला. आज अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही या गोष्टीचा राग सहकाऱ्यांवर काढाल. विरूद्ध लिंगी व्यक्तीकडे आकर्षित झाल्यास तुम्हाला त्रास होईल. त्यामुळे सावध रहा.
मकर:
दिवसाचा पूर्वार्ध लाभदायक असेल. पण एखादी गोष्ट गृहित धरण्याचा स्वभाव असल्याने उणीवा निर्माण होतील. महिला जास्त संशयास्पद मानसिकतेत असतील. त्यामुळे घरात कलह होऊ शकतात. सरकारी किंवा इतर महत्त्वाची कामं दुपारपूर्वी पूर्ण करा. त्यानंतर परिस्थिती बदलेल. कोणत्याही कामात कितीही प्रयत्न केले तरी यशाची खात्री नसेल. आर्थिक समस्या जाणवतील. अधिकाऱ्यांच्या उद्धट वर्तनामुळे ऑफिसमधील लोकांची मनं दुखावतील. अचानक खर्च वाढल्याने कर्ज घेण्याची गरज भासू शकते.
कुंभ:
आजचा दिवस समाधान देणारा असल्याने आनंदात जाईल. ऑफिसमध्ये कोंडीमुळे तुम्ही विशेष कार्यक्रम आयोजित करू शकणार नाही. आर्थिक लाभ होण्याचा वेग संथ असेल. पण तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. धार्मिक विधी आणि उपासनेत सहभागी व्हाल. त्यासाठी पैसे देखील खर्च कराल. व्यावसायिक व्यक्तींना नवीन सौदे मिळतील. त्यामुळे भविष्यात आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. तुमच्या चातुर्यामुळे कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. पण कुटुंबातील महिला तुमच्याकडे काही चुकीच्या मागण्या करू शकतात.
मीन:
आज प्रत्येक कामात यश मिळेल. सुरुवातीला कामात अडचणी आल्या तरी निराश होऊ नका. प्रयत्न सुरू ठेवा. आर्थिक बाबी अस्पष्ट असल्याने महिलांवर टीका होईल. त्यामुळे त्यांनी याबाबत काळजी घ्यावी. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी संवाद साधा. तुम्हाला त्यांचे विचार पटत नसतील तर शांत रहा अन्यथा अनावश्यक वादविवाद होऊ शकतात. दुपारची वेळ चांगली असेल. तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळेल. कौटुंबिक पातळीवर थोडे तणाव असतील पण ते निवळल्यावर स्थिती सामान्य राहील. नातेवाईकांकडून चांगली बातमी समजेल. धार्मिक कार्यात रूची वाढेल.
(या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)