जळगाव : घरची परिस्थिती हलाकीची असल्याने पती- पत्नी दोघेजण सोबत जळगाव एमआयडीसी (MIDC) परिसरातील व्ही-सेक्टरमध्ये असलेल्या दाल मिलमध्ये पती-पत्नी सोबत काम करत होते. मशीनवर सोबत काम करत असताना महिलेच्या गळ्यात असलेल्या स्कार्फने क्षणार्धात होत्याचे नव्हते केले.मशीन चालू होताच गळ्यातील स्कार्फ मशिनच्या पट्ट्यात अडकून महिलेचे शीर धडावेगळे झाले. सरस्वती गोविंद ठाकरे (वय ३५) असे या घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
जळगाव एमआयडिसीतील मुकेश ॲग्रो इंडस्ट्रीजच्या आवारातच सरस्वती ठाकरे व पती गोविंद नानू ठाकरे हे वास्तव्यास होते. मागील दोन वर्षांपासून पती- पत्नी सोबतच दालमिलमध्ये कामाला होते. दरम्यान १२ मार्चला नेहमीप्रमाणे कंपनीत काम करत असताना गोविंद याने पत्नी सरस्वतीला वर जाऊन दालमील यंत्रासाठी आवश्यक आद्रतेनुसार थोडे पाणी व पावडर टाकण्यास सांगितले. यानंतर मशिन सुरु केले. सरस्वती मशिनमध्ये डाळ टाकत असताना गळ्यात बांधलेला स्कार्फ मशिनच्या पट्ट्यात ओढला गेला. गळ्यातील स्कार्फसह सरस्वती ओढली जाऊन तिचे शीर धडावेगळे झाले.
दृश्य पाहून पती कोसळला
मशिनजवळ जोरदार आवाज झाला. काय झाले म्हणून गोविंद हा वर धावत गेला. यावेळी समोरचे दृश्य पाहून तो जमिनीवर कोसळला. आपल्यासोबत जेवण करून काम करणारी पत्नीचे धड एकीकडे तर, मुंडके दुसऱ्या बाजूला पडलेले पाहून गोविंदला काय करावे सुचत नव्हते. यानंतर दालमिलमधील इतर कामगारांनी धाव घेतली. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
हे पण वाचा
- जळगावात एमआयडीसी पोलिसांनी अवैध दारूभट्ट्या केल्या उध्वस्त; 7 लाखांचा मुद्देमालासह 27 जण ताब्यात.
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.