चोपडा तालुक्यातील मेलाने येथे गांजाची शेती उध्वस्त, 44 लाखांचा मुद्देमालासह एकाला अटक

Spread the love

चोपडा प्रतिनिधि (डॉ. सतीश भदाणे)
चोपडा :- तालुक्यातील मेलाने गावात वन पट्ट्यातील शेतीमध्ये मक्याची शेती करीत असताना त्यात आंतरपीक म्हणून गांजा लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी संयुक्तरित्या या गावी जाऊन शेतात पाहणी केल्यावर मक्याच्या पिकामध्ये गांजा लागवड केलेली आढळून आले. दीड एकर क्षेत्रामधील गांजा उपटून एकूण 980 किलो असा 44 लाख 10 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

त्यासोबत शेती करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चालू आहे अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकाऱ्याने दिली. तसेच गांजाची शेती करणाऱ्याबद्दल जर कोणी माहिती दिली तर त्याठिकाणी नक्की कारवाई करण्यात येईल, अशी सूचना देखील पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी दिली. चोपडा तालुक्यात ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सहा महिन्यातील गांजा शेती उध्वस्त करण्याची ही दुसरी कारवाई आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन च्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर हे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार