जळगाव :- एका तरुणाला मारहाण करून त्याच्याजवळील मोबाईल हिसकावून पळणाऱ्या महिलेसह दोन तरुणांना जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी २४ तासांत अटक केली आहे.शहरातील अग्रवाल चौकातील ऍक्झॉन ब्रेन रुग्णालयाजवळ हि घटना घडली होती अक्षय विलास शेलार (वय ३०, रा. गाले ता. रावेर, ह.मु निमखेडी रोड, अशोक बेकरीजवळ, जळगांव) याने फिर्यादीत म्हटले आहे कि, रविवारी दि. १० मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अग्रवाल चौकातील ऍक्झॉन ब्रेन हॉस्पिटल जवळून दुचाकीने जात असताना एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर एक महिला व दोन तरुणांनी त्याला थांबविले. तुला काही मदत हवी आहे का असे विचारले. मात्र त्याने नकार देताच संशयित तिघांनी त्याला २०० रुपयांची मागणी केली.
फिर्यादी अक्षय याने पैसे नसल्याचे सांगितले. तेव्हा दुचाकीवरील महिलेने त्याला चापट्याने मारहाण केली. तसेच त्याच्याकडील मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला. व अग्रवाल चौकाच्या दिशेने पळून गेले.अक्षय शेलार याने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. गुन्हे शोध पथकातील पो.ना जुबेर तडवी, पो.कॉ अमितकुमार मराठे यांना गुप्त बातमी मिळाली. पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी गुन्हे शोध पथकातील पो. हे.कॉ सलीम तडवी, पो.कॉ. मिलींद सोनवणे, पो.कॉ. तुषार पाटील, म.पो. कॉ. वैशाली सादरे, चा. पो. हे.कॉ. साहेबराव खैरनार अश्यांचे पथक तयार करुन रवाना केले.
पथकाने घटनेतील संशयित शेख अजरुद्दीन शेख हुस्नोदीन ऊर्फ भुतपलीत (वय-३२ रा. शाहुनगर प्रिप्राळा रोड, जळगांव), मंगल सोमा सोनवणे (वय-२८ रा- प्रिंप्राळा हुडको, साईबाबा मंदीर जवळ, जळगांव) यांना पिंप्राळा हुडको परिसरातुन दि. ११ मार्च रोजी ताब्यात घेवून अटक केली. तर मंगळवारी सदर गुन्ह्यातील संशयित महीला आरोपी जया जुलाल जाधव, (वय-२८ रा घर न.सिध्दार्थ नगर, पिंप्राळा हुडको, जळगांव) हिस अटक केलेली आहे. सदर आरोपीतांच्या कब्जातून हिसकावून नेलेला ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्र. (एमएच १९ एटी ७८६८) असा एकूण ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पो.उप निरी. उल्हास च-हाटे हे करीत आहेत.
हे पण वाचा
- ViralVideo:पतीने आपल्या पत्नीला परपुरुषासोबत भररस्त्यात रंगेहात पकडले, पतीला आला संताप, पुढे काय झालं पहा व्हिडिओ.
- मुख्याध्यापिकेला रग्गड पगार तरीपण पैशांचा मोह आवरेना; प्रसूती रजा मंजुरीसाठी 36 हजार रुपयांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले.
- अमळनेर तालुक्यात ३२ वर्षीय इसमाने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा.
- पंचायत समिती कडुन नागरीकांना होणाऱ्या गैरसोयी तातडीने थांबवा – आमदार मा.अमोलदादा पाटील
- जळगाव शहरातील उच्चस्तरीय हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा,8 जुगारींना अटक, 20 लाख रुपयांच्या रोकडसह मुद्देमाल जप्त.