पिंपळगाव बसवंत : मुखेड (ता. निफाड) येथील सुरूची आश्रमशाळेत संस्थाचालकाने मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपळगाव पोलिस ठाण्यात संस्थाचालकाविरोधात विनयभंग व पोक्सा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.सुभाष दिनेश चौधरी, असे संशयित संस्थाचालकाचे नाव आहे. मुखेडच्या आश्रमशाळेत मागील वर्षी इयत्ता अकरावी शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या वसतिगृहात सुभाष चौधरी गेला. मुलीचे कपाट तपासणीचा बहाणा करू लागला.
काही मुलींशी लज्जास्पद वर्तन केले, तर एका विद्यार्थिनीच्या विनयभंग केला. ‘रात्री नऊला माझ्या खोली दोनमध्ये ये’, ‘आपण गप्पागोष्टी करू’, असे त्या मुलीला सांगितले. याबाबत कुणाला काही सांगितले, तर शाळेतून काढून टाकण्याची धमकी चौधरीने संबंधित विद्यार्थिनीला दिली. हा प्रकार पीडित विद्यार्थिनीने प्राचार्य चंद्रकांत आहेर, मुख्याध्यापक नंदकुमार पगार, अधीक्षिका पाटील, शिक्षिका वाघ, जाधव यांच्यापुढे कथन केला.
याबाबत पिंपळगाव पोलिस ठाण्यात चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित चौधरीला अद्याप पिंपळगाव पोलिस अटक करू शकलेले नाहीत. संशयित चौधरी याच्याविरोधात अजून काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाराशरी शिक्षण संस्थेची आश्रमशाळा चौधरी याने पाच वर्षांसाठी कराराने चालविण्यासाठी घेतली आहे. मुखेड येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन चार दिवस उलटले, पण पिंपळगावचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ केली.
हे पण वाचा
- ViralVideo:पतीने आपल्या पत्नीला परपुरुषासोबत भररस्त्यात रंगेहात पकडले, पतीला आला संताप, पुढे काय झालं पहा व्हिडिओ.
- मुख्याध्यापिकेला रग्गड पगार तरीपण पैशांचा मोह आवरेना; प्रसूती रजा मंजुरीसाठी 36 हजार रुपयांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले.
- अमळनेर तालुक्यात ३२ वर्षीय इसमाने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा.
- पंचायत समिती कडुन नागरीकांना होणाऱ्या गैरसोयी तातडीने थांबवा – आमदार मा.अमोलदादा पाटील
- जळगाव शहरातील उच्चस्तरीय हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा,8 जुगारींना अटक, 20 लाख रुपयांच्या रोकडसह मुद्देमाल जप्त.