Viral Video: रेल्वेत नेहमी काही ना काही मनोरंजक घटना घडत असतात. अनेकदा रेल्वेमध्ये भांडणं झाल्याचं आपण पाहतो. या भांडणांचे व्हिडिओही सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत असतात.आता असाच एक भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरूणी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. खरं तर सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अनेकदा लोकं सार्वजनिक ठिकाणांचा वापर करतात. हे लोकं सार्वजनिक ठिकाणी नाचायला देखील मागे पुढे पाहत नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील असल्याची माहिती मिळत आहे. अगदी मनसोक्तपणे तरूणी रेल्वेमध्ये डान्स करताना दिसत आहे.
रेल्वेमध्ये तरूणीचा डान्स
गर्दीच्या ट्रेनमध्ये या मुलीच्या डान्समुळे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. ही मुलगी शकीराच्या ‘वाका वाका’ या हिट गाण्यावर डान्स करत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगला व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याला 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर सकारात्मक तर अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलं आहे. सार्वजनिक उपद्रव निर्माण करण्यासाठी आजूबाजूचे लोक आयपीसीच्या कलम 268 अंतर्गत कायदेशीररित्या तिच्यावर गुन्हा दाखल करू शकतात, अशी एका युझरने कमेंट केली आहे.
ट्रेन आणि गर्दीच्या ठिकाणी डान्स
सार्वजनिक ठिकाणी डान्स केल्यामुळे या मुलीला टीकेला सामोरे जावे लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. या मुलीचे इंस्टाग्राम अंकाउंटमध्ये ट्रेन आणि गर्दीच्या ठिकाणी केलेल्या डान्सचे (Video Viral On Social Media) आहेत. अनेकदा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रील बनविण्यासाठी फेमस होण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांचा वापर करत असल्याचं बघायला मिळत आहे.
हे पण वाचा
- हृदयद्रावक…सात जन्माचं वचन देताना नवरदेवाच्या छातीत कळ आली; लग्नाच्या विधींपूर्वीच वराने घेतला वधूच्या कुशीतच अखेरचा श्वास.
- धक्कादायक! पत्नीचे तिच्या मित्राशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने भररस्त्यावर चाकूने वार करून केली पत्नीची हत्या.
- अमळनेर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार.पोलिसात गुन्हा दाखल.
- शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॉक मध्ये तात्काळ नोंदणी करावी-शेतकरी नेते सुनील देवरे ; महाराष्ट्र शेतकरी संघटना तालुकास्तरावर शिबिर आयोजित करणार
- एरंडोल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित वही तुला