रावेर प्रतिनिधी(प्रशांत सरवदे)
रावेर :- आज भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत रावेरमधून विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना पुन्हा तिकिट जाहीर केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचे तिकिट कापले जाणार असल्याची चर्चा सुरू असतांनाच त्यांनाच पुन्हा तिकिट मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तर दुसरीकडे यामुळे तिकिटाचे प्रबळ दावेदार असणार्या विद्यमान जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या समर्थकांमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली आहे.
यातूनच यावल-रावेरमधील शेकडो पदाधिकार्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे हे त्यांच्याकडे सुपुर्द केले आहेत. कोणत्याही स्थितीत आपण रक्षा खडसे यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका या पदाधिकार्यांनी घेतली आहे.दरम्यान, राजीनामा देणार्या पदाधिकार्यांमध्ये पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हिराभाऊ चौधरी, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष राकेश फेगडे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, ओबीसी मोर्चा राज्य उपाध्यक्ष हर्षल पाटील, नारायणबापू चौधरी यांच्यासह शेकडो पदाधिकार्यांचा समावेश आहे.

रात्री उशीरापर्यंत भालोद येथे या पदाधिकार्यांनी आपण अमोल जावळे यांच्या सोबत असल्याचे सांगत संतप्त भावना व्यक्त केल्या. तर, या संदर्भात स्वत: अमोल जावळे यांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तथापि, या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली असून याचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हे पण वाचा
- Viral Video: मार्केटमध्ये एक सुंदर ड्रेस दोन महिलांना आवडला तो घेण्यावरून सुरू झाला वाद मग सुरू झाली तुंबळ हाणामारी पहा व्हिडिओ
- महाविद्यालयाच्या हॉस्टेलच्या बाथरूममध्ये इतर मुलींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ शूट करून तरुणीने क्लिप्स पाठवल्या प्रियकरास, तरुणीस पोलिसांनी घेतले ताब्यात.
- हृदयद्रावक! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हळद सुकण्यापूर्वीच नववधूच्या मांडीवर डोके टेकत नवरदेवाने सोडला प्राण, सर्वत्र हळहळ.
- संघटित गुन्हे करणाऱ्या घरफोडीतील गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद,१लाख ८५ हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त.
- Viral Video:एक्स्प्रेसवेवर तरुणांची सुसाट वेगाने बाईक चालवत जीवघेणी स्टंटबाजी; तोल जाताच कोसळले, मागून आला ट्रक अन् पहा काळजात धडकी भरेल असा व्हिडिओ.