कवर्धा (छत्तीसगड) :- गुन्हे कोणत्याही प्रकारचे असले, तरी वाईटच; त्यांचं समर्थन करताच येणार नाही; पण अत्यंत विचित्र आणि कल्पनाही करता येणार नाहीत अशा कारणांनी घडत असलेल्या गुन्ह्यांच्या घटना सुन्न करून टाकतात. अशीच एक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. तिथे एका तरुणाने आपल्या मोठ्या भावाची हत्या केली आहे. त्यामागचं कारण म्हणजे त्याचं मोठ्या भावाच्या पत्नीवर म्हणजे आपल्या वहिनीवर प्रेम जडलं होतं. आपल्या भावाचा अडथळा दूर करण्यासाठी त्याने त्याचा काटा काढला.छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यातल्या कुकदूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातल्या बांगर नावाच्या गावात ही घटना घडली आहे.
पंचम सैयाम यांचा मोठा मुलगा बिरसू राम (33) आपली पत्नी आणि कुटुंबीयांसह आनंदाने राहत होता; मात्र त्या आनंदात त्याच्या धाकट्या भावाने मिठाचा खडा टाकला. भीम सैयाम असं त्याचं नाव. भीमची आपल्या वहिनीवर म्हणजेच बिरसू रामच्या पत्नीवर नजर होती. त्याची माहिती बिरसू रामला कळली होती. त्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता. त्यातून तो खूप जास्त प्रमाणात मद्यपान करू लागला होता.
नेमकं काय घडलं?
गेल्या शुक्रवारी बिरसू राम असाच मद्यपान करून घरी आला. तेव्हा त्याचा फायदा घेऊन भीमने मोठ्या भावाला मालिश करण्याच्या बहाण्याने त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याने जवळच्या काही नातेवाईकांना सांगितलं, की बिरसू रामचा अचानक काही अज्ञात कारणांमुळे मृत्यू झाला आहे. सर्वांनाच या प्रकारामुळे धक्का बसला. यापुढची गोष्ट म्हणजे तो मृत भावाचं शव घाईघाईने अंत्यसंस्कारांसाठी घेऊन गेला.गावकऱ्यांना या प्रकाराची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी बिरसूच्या मृत्यूचं कारण भीमला विचारलं. तेव्हा त्याने वेगवेगळी उत्तरं दिली.
त्यामुळे गावकऱ्यांना यात काही तरी काळंबेरं असल्याचा संशय आला आणि भीमबद्दलही संशय वाटू लागला. गावकऱ्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांच्या भीतीने आरोपी भीम बिरसूचं शव पुन्हा घरी घेऊन आला. पोलिसांनी खूप बारकाईने तपास करून अखेर भीमला मोठ्या भावाच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली.पोलिसांनी सांगितलं, की ‘आपल्याच सख्ख्या वहिनीच्या प्रेमात पडून आरोपी भीम सैयाम याने आठ मार्च रोजी रात्री आपल्या मोठ्या भावाची हत्या केली.’ पोलिसांनी आरोपीला कलम 302नुसार अटक करून तुरुंगात पाठवलं आहे.
हे पण वाचा
- गुणगौरव समारंभामुळे गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षकांना प्रोत्साहन आमदार मा.अमोलदादा पाटील
- मारुती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या दोघांना डंपरची जोरदार धडक,दुचाकीस्वार तरुण ठार तर मित्र गंभीर जखमी.
- एरंडोल येथे वैफल्यग्रस्त ३८ वर्षीय युवकाची गळफास घेवून संपविले जीवन.
- मोयखेडा दिगरला घरकुल नाही तर कुळघर/ घरकुल योजनेचा फज्जा; गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सुद्धा समितीचा चौकशीकडे कानाडोळा.
- प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन