छतरपूर : आनंदाच्या क्षणी गिफ्ट किंवा भेटवस्तू दिल्या जातात. हा क्षण आठवणीत राहावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे या भेटवस्तू देण्यासाठी लोक विविध प्रकारच्या युक्त्या करतात.यातच आता गिफ्ट देण्याच्या नादात संपूर्ण कुटुंबाच्या मागे पोलीस कारवाई होणार आहे.दिराने आपल्या नवविवाहित वहिणीच्या हातात देशी बंदूक देत फोटो काढला. यानंतर तो फोटो सोशल मीडियावर टाकला. यानंतर हा फोटो व्हायरल झाला. त्यामुळे ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांनी याप्रकरणी या तरुणाचा शोध घेत त्याला अटक केली.
तसेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतकेच नव्हे तर नवविवाहित वहिनी आणि तिच्या कुटुंबीयांचीही पोलीस चौकशी केली जाऊ शकते. या एका कृत्यामुळे संपूर्ण कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत. ही घटना मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील सिव्हिल लाइन पोलीस ठाणे हद्दीतील आहे. याठिकाणी कतरवारा गावातील 21 वर्षांच्या साहिल नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. अशा बेकायदेशीर कामांवर नजर ठेवणाऱ्या पोलिसांनी या व्हायरल फोटोची चौकशी करण्यासाठी एसपी अमित सांघी यांच्या सूचनेनुसार एक पथक तयार केले.
या पथकाने सर्वप्रथम त्या तरुणाची ओळख पटवली आणि त्याच्या गावात जाऊन शोध घेतला. त्यावेळीही या तरुणाकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळली.त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याच्यावर आर्म्स कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. चौकशीत अशी माहिती समोर आली आहे की, त्याची वहिनी विदाईनंतर पहिल्यांदा सासरी आली होती. त्यावेळी त्याने हे देशी बनावटीचे पिस्तूल वहिनीला भेट देत फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला.
यानंतर मात्र हा फोटो व्हायरल झाला. याबाबत छतरपुर एडिशनल एसपी विक्रम सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, असा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाला, अशी माहिती मिळाली होती. यानंतर सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याचे प्रभारी यांच्या नेतृत्वाखाली तपास करून तरुणाला त्याच्याच गावातून पकडण्यात आले. त्याचे फॉलोअर्स वाढावेत आणि नातेवाईकही प्रभावित व्हावे या उद्देशाने त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या स्टेटसमध्ये फोटो अपलोड केला, असे त्याने सांगितले.
हे पण वाचा
- २० वर्षांपूर्वी झाले लग्न,१८ अन् १६ वर्षाची दोन मुले असलेल्या कुटुंबात झाला कलह पत्नीने गळफास घेऊन अन् दुसऱ्याच दिवशी पतीनेही रेल्वेसमोर उडी घेऊन संपविले जीवन.
- जळगाव शहरातून चोरी झालेली महागडी कार पोलीस उपनिरीक्षक व सहकाऱ्यांनी राजस्थानातून केली हस्तगत.
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.