नागपूर:- मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रचना गृह निर्माण सहकारी संस्था येथे काम करणाऱ्या एक तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे.कौटुंबिक वादातून तरूणाने त्याच्याच बहिणीचं कुंकू पुसलं. रागाच्या भरात त्याने जावयाचीच हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. मात्र या हत्येनंतर आरोपी तरूण हा फरार झाला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. रवी कहार असं मृत इसमाचं नाव असून, रवी कहारची हत्या त्याच्याच मेहुण्यानं अरुण अन्नू बनवारी याने केली. तेव्हापासूनच अरूण हा फरार आहे. बेलतरोडी पोलीसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
मध्यप्रदेशमधून कामासाठी आले पण..
मृत रवी आणि आरोपी अरूण हे दोघेही मूळचे मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील आहेत. शिवनगाव पुनर्वसन ले-आउट येथे गटार पाईप लाईनचे काम करण्यासाठी, ते नागपूरमध्ये आले होते. मात्र घटनेच्या दिवशी आरोपी अरुण आणि रवी यांच्यात काही कारणावरून भांडण झाले. वाद वाढला आणि रागाच्या भरात आरोपी अरूण बनवारीने जावई रवी याला लाकडी दांडयाने बेदम मारहाण केली, त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. रवी याला उपचारांसाठी तातडीने मेडीकल हॉस्पीटल येथे नेले. पण तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषीत केले.
याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.घटनेतील मृतक रवी कहार छिंदवाडा येथील रहिवासी आहेत. तो, त्याची पत्नी आणि मेहुणा तिघेही नागपूर येथे एकत्र राहत होते. ते तिघेही दोन महिन्यांपूर्वीच नागपुरात आले होते. अज्ञात कारणावरून दोघांच्या पत्नीमध्ये भांडण झालं होतं, त्या वादाचं रूपांतर हत्येच्या घटनेत झालंय. सध्या आरोपी फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
हे पण वाचा
- हृदयद्रावक…सात जन्माचं वचन देताना नवरदेवाच्या छातीत कळ आली; लग्नाच्या विधींपूर्वीच वराने घेतला वधूच्या कुशीतच अखेरचा श्वास.
- धक्कादायक! पत्नीचे तिच्या मित्राशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने भररस्त्यावर चाकूने वार करून केली पत्नीची हत्या.
- अमळनेर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार.पोलिसात गुन्हा दाखल.
- शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॉक मध्ये तात्काळ नोंदणी करावी-शेतकरी नेते सुनील देवरे ; महाराष्ट्र शेतकरी संघटना तालुकास्तरावर शिबिर आयोजित करणार
- एरंडोल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित वही तुला