Viral Video : नेहमी ड्रायव्हिंग करताना रस्त्यावर वाहनं सावकाश चालवणं गरजेचं आहे. वाढत्या अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी जगभरात यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येतात.अशा ड्रायव्हिंगचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ समोर येत असतात. महिलांच्या ड्रायव्हिंगबाबतचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. खास करून त्या मुलींचे ज्या स्कूटर किंवा बाईक चालवतात. त्यांना ‘पापा की परी’ वैगरे टॅग दिले जातात.
प्रत्येक वेळी हे खरं आहे असं नाही. कारण अशी अनेक मुलींची उदाहरणेही आपल्या समोर आहेत ज्या त्या कॅटेगरीत येत नाहीत, किंवा अशा अनेक मुली आहेत ज्या उत्तम प्रकारे ड्रायव्हिंग करतात.पण सध्या इंस्टाग्रमावर एक व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. हा व्हिडीओ इंडोनेशियातील असल्याची माहिती आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन मुलींनी बाईक चालवताना केलेला कारनामा दिसत आहे. ड्रायव्हिंग करताना येत नसल्याने त्यांचा तोल गेला आणि बाईक थेट घराच्या छतावर गेली. बाईक चालवताना ब्रेकवरून हात सुटल्याने हा सगळा प्रकार घडतो.
या घटनेत घराच्या छताचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. कौलारू घराच्या छतात रूतुन बसलेल्या बाईकसोबत दोन मुली देखील दिसतायत. थेट कौलांवर बाईक अडकल्याने आजु-बाजुची माणसं या मुलींची मदत करण्यासाठी पुढे सरसावली आहेत. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट हसू लागलेत.सध्या या दोन मुलींचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर लोकांनी त्या मुलीला प्रचंड ट्रोल केलं आहे. अनेकांनी कमेंटमध्ये ‘हवा हवाई’ असं म्हटलं आहे. हे सगळं पाहून काही नेटकऱ्यांना प्रचंड राग आला आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






