प्रतिनिधी l अमळनेर
अमळनेर :- तालुक्यातील झाडी येथे शुक्रवारी १५ मार्च रोजी मध्यरात्री २.३० वाजता अचानक लागलेल्या भीषण आगीत २० बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. यात तीन लाखांचे नुकसान झाले आहे.याबाबत अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील झाडी येथे शिवदास यादव भिल हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेळी पालन करून ते आपला उदरनिर्वाह करतात.
घराच्या मागील बाजूस असलेल्या झोपडीत बकऱ्या बांधलेल्या होत्या. शुक्रवारी १५ मार्च रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास झोपडीला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर शिवदास भिल यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना घटना कळवताच त्यांनी अग्निशमन बंब पाठविलाा. अग्निशमन दलप्रमुख दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख, आनंदा झिम्बल यांनी आग विझवली. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. तब्बल २० शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यात शिवदास भिल यांचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत मारवड पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.