वाराणसी (उत्तर प्रदेश) :- येथे एका 11वीच्या विद्यार्थिनीच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे. ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर विद्यार्थिनीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी काल आरोपी कोचिंग ऑपरेटरला अटक केली. अहवालानुसार, मुलीच्या वडिलांनी कापसेठी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी बनारस रेल्वे स्थानकावर काशी एक्सप्रेस ट्रेनच्या बोगीमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला होता.पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांना बोलावून घेतले.
त्यांनी मृतदेह आपल्या मुलीचा असल्याची ओळख पटवली. आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी कुटुंबीय पोलिसांकडे विनवणी करत होते. या घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांचे पथकही कार्यरत होते. काल पोलिसांनी संजय कुमार पटेल नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले.चौकशीत त्याने स्वत:ची ओळख कोचिंग ऑपरेटर असल्याचे सांगितले. त्याने विद्यार्थिनीच्या हत्येबाबत धक्कादायक खुलासा केला. आरोपीने सांगितले की, मुलगी 2022 मध्ये नववीच्या कोचिंगसाठी त्याच्याकडे आली होती. तिने 2023 साली त्याच कोचिंगद्वारे 10वीचे शिक्षणही घेतले.
यादरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे नोव्हेंबर 2023 मध्ये विद्यार्थिनीने त्याला सांगितले की ती गर्भवती होती. त्यावर संजयकुमार पटेल याने मुलीला गर्भपात करण्याचा सल्ला दिला. मात्र विद्यार्थिनीने रुग्णालयात जाण्यास नकार देण्यास सुरुवात केली. तिला बदनामी होण्याची भीती होती. मात्र त्यानंतर या कोचिंग डायरेक्टरने एक धोकादायक योजना आखली. मुलगी दवाखान्यात न गेल्याने आरोपीने गरोदर विद्यार्थिनीला हटवण्याचा कट रचला.त्याने खोटे बोलून 19 फेब्रुवारीला मुलीला बोलावून घेतले.
मुलीला विश्वासात घेऊन तिला झोपेची गोळी दिली. त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात टाकून काही तास कोचिंगमध्ये ठेवल्यानंतर तो दुचाकीला बांधून सेवापुरी स्थानकात नेण्यात आला. तिथे लखनऊ इंटरसिटी एक्स्प्रेसच्या बोगीमध्ये दोन टॉयलेटमध्ये ती गोणी ठेवण्यात आली. ट्रेन बनारस स्टेशनवर परतल्यावर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. अशाप्रकारे गुरू-शिष्य नात्याला काळीमा फासणारी बातमी चर्चेचा विषय बनली आहे. आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.