एक फुल दो माली!एकाच मुलीच्या प्रेमात पडलेल्या दोन तरूणांच्या गटामध्ये रस्त्यावरच जोरदार वाद एकमेकांवर केला गोळीबार.

Spread the love

कानपूर :- युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हणातात. प्रेमात तर लोक काहीही करू शकतात, कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण त्यात कोणाचा जीव पणाला लागला तर ? असाच एक किस्सा उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडला जिथे, दोन गटांमध्ये थेट रस्त्यावरच फायरिंग झालं.आणि त्याचं कारण होतं एक मुलगी.. हो, तुम्ही बरोबर वाचलंत. एकाच मुलीच्या प्रेमात पडलेल्या दोन तरूणांच्या गटामध्ये जोरदार वाद झाला आणि प्रकरण थेट गोळीबारापर्यंत गेलं.

हे प्रकरण चमनगंज ठाणे क्षेत्रातील आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तेथे पोहोचले आणि त्यांनी तीन आरोपींना अटक केली. पण मुख्य आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. या सर्व आरोपींविरोधात पोलिसांवी हत्येचा आरोप तसेच 7 सीएलए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

एकाच तरूणीच्या प्रेमात 2 तरूण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरच्या कर्नलगंज येथील रहिवासी असलेल्या हतीफचे ज्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते, त्याच मुलीशी चमनगंजचा येथील तरूण ताहा हादेखील बोलायचा. एकच मुलगी आपल्या दोघांशी बोलत असल्याचे , त्यांना समजल्यावर दोन्ही तरूणांचे आधी फोनवरून भांडण सुरू झाले. मात्र तिथे भांडण न मिटल्याने त्यांनी एकमेकांना चमनगंज येथील टाकिया पार्कजवळ येऊन प्रकरण मिटवण्याचे आव्हान दिले.बुधवारी रात्री दोघेही तेथे पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत आणखी काही मुलेही होती. तेथे आधी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि काही वेळातच दोघांनी एकमेकांवर गोळीबार सुरू केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी तीन राऊंड गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर दोन्ही बाजूचे लोक घटनास्थळावरून पळून गेले. डीसीपी आरएस गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या तपासासाठी एसीपी श्वेता कुमारी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. पोलिसांना घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तीन आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी दोन पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार