मुझफ्फरपूर :- प्रेमप्रकरणाची एक अजब घटना समोर आली आहे. एका लग्नसोहळ्यामध्ये व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी करण्यासाठी आलेला फोटोग्राफर नवरदेवाच्या अल्पवयीन बहिणीला घेऊन फरार झाला. या घटनेनंतर तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेत या तरुणीला शोधून काढण्याची विनंती केली आहे.मुलाच्या विवाहात आलेला फोटोग्राफरच त्यांच्या अल्पवयीन मुलीला घेऊन फरार झाला, असा आरोप या नातेवाईंकांनी केला आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.
मुझफ्फरपूरमधील चंदवाराघाट दामोदरपूर गावात ही घटना घडली आहे. ४ मार्च रोजी येथे एका तरुणाचा विवाह होता. इथून दुसऱ्या गावात वरात जाणार होती. लग्नाच्या कार्यक्रमाचं छायाचित्रण करण्यासाठी मुलाच्या भाओजींच्या गावातून एक व्हिडीओग्राफर बोलावण्यात आला होता. त्याने लग्न सोहळ्याचं प्रत्येक बाजूने चित्रिकरण केलं. मात्र याचदरम्यान त्याची नवऱ्याच्या बहिणीसोबत नजरानजर झाली. त्यानंतर लग्नसोहळा संपल्यानंतर हा व्हिडीओग्राफर नवऱ्याच्या बहिणीला घेऊन फरार झाला.अहियापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनामध्ये पीडित कुटुंबानं लिहिलं आहे की,
लग्नानंतर नवरदेवाची अल्पवयीन बहीण बाजारात जाते म्हणून सांगून घराबाहेर पडली. मात्र रात्रभर ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र दोन दिवस उलटल्यानंतरही ती सापडली नाही. यादरम्यान, नवरदेवाच्या भाओजींना त्यांच्या मेहुणीला त्यांच्याच गावातील एक व्हिडीओग्राफर घेऊन पळाल्याची माहिती मिळाली. तेव्हापासून कुटुंबीय या तरुणीचा शोध घेत आहेत.मुलीच्या वडिलांनी आरोप केला की, मुलाच्या लग्नात आलेला व्हिडीओग्राफर माझ्या मुलीला घेऊर फरार झाला असल्याची ठाम माहिती आमच्याकडे आहे.
बाहेर जाण्यापूर्वी तो त्याच्या घरीही गेला होता. मात्र ही गोष्ट आता त्याचे कुटुंबीय मान्य करत नाही आहेत. दुसरीकडे अहियापूरचे पोलीस अधिकारी रोहन कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास केला जात आहे. मात्र ही संपूर्ण घटना आता चर्चेचा विषय ठरली आहे.
हे पण वाचा
- Viral Video :”तू माझ्या आईला शिवीगाळ कशी काय करू शकतेस?” एकमेकींच्या झिंज्या उपटत दोन महिलांमध्ये तुफान राडा पहा व्हिडिओ.
- अपूर्ण अवस्थेतील घरकुल योजना पूर्ण करून बेघरवासीयांना घरकुले मिळून द्यावीत; एरंडोल येथील घरकुलांचे भिजत घोंगडे सोडण्याची आमदार अमोलदादा पाटील यांच्याकडे मागणी.
- घरगुती गॅस सिलिंडर मधून बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरणाऱ्या टोळीवर अमळनेर पोलिसांच्या छापा, 38 गॅस सिलिंडर जप्त, चौघांना अटक.
- जळगाव एलसीबीच्या पथकाने बाहेर जिल्ह्यातील अट्टल दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; चार दुचाकी जप्त.
- Viral Video: गावातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत गुरुजींचा घृणास्पद प्रकार विद्यार्थ्यांना चक्क….. पहा संतापजनक व्हिडिओ.