यावल :- तालुक्यातील मोहराळा ते कोरपावली रस्त्यावर कोरपावली शिवारातून बेकायदेशीररित्या वृक्षतोड करून त्यांची अवैधरित्या वाहतूक करतांना यावल वनविभागाच्या पथकाने ट्रक्टरचालकावर कारवाई केली आहे. यात ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वृक्षतोड करणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. कोरपावली ता. यावल शिवारात बेकायदेशीररित्या वृक्षतोड करून त्यांची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांना मिळाली होती
तेव्हा या मिळालेल्या गुप्त बातमी वरून आदेशावरून मोहराळा ते कोरपावली या रस्त्यावर रविवार १७ मार्च रोजी वनविभागाने सापळा लावला व या रस्त्यावर सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. १९ बी.जी. ६२१० हे अवैद्य रित्या लाकडांची वाहतूक करतांना मिळून आले. यावेळी ट्रॅक्टर चालकाकडे लाकूड वाहतूकीचा परवाना मांगीतला असता त्याच्या कडे परवाना नव्हता तेव्हा पंचनामा करून ट्रक्टर जप्त करुन यावल वनविभागाच्या वनउपज केंद्रात लावण्यात आले. व ट्रॅक्टरसह चालक खलील रफिक तडवी रा. कोरपावली याला अटक केली आहे. या कारवाईत अंजन, निम इमारती लाकूड आणि टॅक्टर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आले आहे.
याप्रकरणी वाहन चालक खलील तडवी याच्या विरूध्द भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, (२) ब, ४२, ५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई.
सदरील कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांचे मार्गदर्शनाखाली यावल पश्चिम वनक्षेत्रपाल सुनिल भिलावे, यावल पुर्व वनक्षेत्रपाल स्वप्नील फटांगरे सह त्यांच्या पथकाने केली आहे या कारवाई मुळे अवैद्य वृक्ष तोड व अवैद्य लाकुड वाहतुक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
हे पण वाचा
- गावा- गावात गुलाबभाऊंच्या भगव्या वादळाची तुफान लाट;१२ दिवसांत १२१ गावांत शिवसेनेच्या धनुष्याचा डोर- टू – डोर जयघोष
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेचा भक्कम पाठिंबा
- अपक्ष उमेदवार डॉ हर्षल मानेच्या प्रचारात सौभाग्यवतींनी घेतली प्रचारात आघाडी; गावोगावी महिला औक्षण करुन देत आहे विजयी होण्याच्या आशीर्वाद.
- गुलाबभाऊंच्या “धनुष्यबाणाला” प्रचंड मतांनी विजयी करा, माजी सभापती ललिताताई कोळी यांचे आवाहन
- अमळनेर येथे दुचाकीवरून साडे तीन किलो गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद, १ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त.