सुनेला तरुणाने मोटारसायकलने पळवून नेले म्हणून राग आलेल्या सासऱ्याने तरूणाच्या वडिलांची हत्या; आईस केले गंभीर जखमी.

Spread the love

सातारा :- सुनेला पळवून नेल्याच्या रागातून विवाहितेच्या सासऱ्याने तरूणाच्या वडिलांची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. साताऱ्यातील कराड तालुक्यातील सैदापूर गावात हि धक्कादायक घटना घडली आहे.बाबा मदने (रा. तडवळे, ता. खटाव, जि. सातारा), असे खून झालेल्या मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी संशयित विजय धर्मा जाधव ( रा. सैदापूर, ता. कराड) याला कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताने यावेळी तरुणाच्या आईवर आणि भावावर सुद्धा खुनी हल्ला केल्याचे समजत आहे.

या एकूण संपूर्ण प्रकाराने कराड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.याबाबत कराड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैदापूर (ता. कराड) येथील संतोष देसाई यांचे अंबक वस्तीवर गुऱ्हाळ आहे. त्यांच्या गुऱ्हाळावर बाबा मदने, त्यांची पत्नी इंदू आणि मुलगा अक्षय, अजित हे ऊसतोड कामगार आहेत. बुधवारी रात्री ९ च्या सुमारास संशयित विजय धर्मा जाधव हा मोटरसायकलवरून मदने यांच्या घरी आला. आपली सून सपनाला अक्षयने पळवून नेले आहे. तुम्हाला लय मस्ती आली आहे. आता तुम्हाला कोणालाच जिवंत सोडणार नाही. संपवून टाकतो, असे म्हणत विजय धर्मा जाधव याने खिशातील चाकू काढला आणि बाबा मदने यांच्या छातीवर सपासप तीन वार त्यांची निर्घृण हत्या केली.

बाबा मदने यांची हत्या केल्यानंतर संशयिताने इंदू मदने यांच्या पोटात व डोक्यात तसेच मुलगा बाबा मदने याच्या हातावर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. ,या थरारक घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, श्रीसुंदर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, उपनिरीक्षक शेख, डिसले हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयिताला तात्काळ ताब्यात घेतले . बाबा मदने (वय २२) याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशमित विजय दर्मा जाधव याला अटक केली. पोलीस निरीक्षक श्रीसुंदर या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार