लखनऊ : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. नवरी आणि नवरदेव दोघंही या दिवसाची आतुरतेनं वाट पाहात असतात. सगळ्या पाहुण्यांच्या नजरा लग्नात या दोघांकडेच खिळलेल्या असतात.हे जोडपंही आपला दिवस अधिक खास बनवण्यासाठी काहीतरी नवीन किंवा वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतं. मात्र, कधीकधी हा अतिउत्साहही महागात पडू शकतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे, ज्यात एका नवरदेवासोबत काहीसं असंच घडलं.उत्तर प्रदेशातील संभल येथे लग्नाच्या स्टेजवर नवरदेवाने नवरीला उचलून घेतलं, यानंतर वधू चांगलीच भडकली.
नवरीने थेट लग्नास नकार दिला. कुटुंबीयांनी वधूला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती राजी झाली नाही. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये पंचायत झाली, त्यानंतर नवरदेवाच्या बाजूला हुंडा परत करून लग्न न करताच परतावं लागलं.13 मार्चच्या रात्री याच परिसरातील सकतपुर गावात लग्नाची वरात आली होती. वधूपक्षातील लोकांनी मोठ्या उत्साहात लग्नाच्या वरातीचं स्वागत केलं. वाद्य वाजवून विधी सुरू झाले आणि वधू-वर स्टेजवर पोहोचले. लग्नातील पाहुणे मेजवानी खाण्यात आणि डीजेवर नाचण्यात व्यस्त होते. शंखध्वनीने वधू-वराच्या वरमाळा सोहळ्याला सुरुवात झाली.
यादरम्यान, वराने वधूला स्टेजवरच उचलून घेतलं. वधूने स्टेजवरच या प्रकरणावर आक्षेप घेतला. वधू पक्षाच्या लोकांनीही नवरदेवाच्या या कृतीवर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. यामुळे संतापलेल्या नववधूने स्टेज सोडलं. नवरदेवाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती थांबली नाही.वधूची समजूत घालण्यासाठी नातेवाईक आले असता वधूने लग्नास स्पष्ट नकार दिला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत नवरीची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र वधू लग्नासाठी तयार झाली नाही. नवरीने लग्नाला नकार तर दिलाच पण वराला आणि वराच्या बाजूच्या दोन लोकांना खोलीत बसवलं. यावेळी वधू-वर यांच्यात वादही झाला.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गुरूवारी सकाळी पोलिसांनी दोन्ही पक्षांना बसवून बोलायला लावलं, मात्र वधू राजी झाली नाही. यानंतर, हुंड्याच्या सर्व वस्तू परत करण्याची मागणी नवरीकडच्या लोकांनी केली. गुरुवारी दुपारी नवरदेवाच्या बाजूच्या लोकांनी केली. गुरुवारी दुपारी नवरदेवाच्या बाजूच्या लोकांनी हुंड्याच्या वस्तू वधूच्या घरी आणल्या, तेव्हा वधूने नवरदेवाला आणि त्याच्यासोबतच्या लोकांना जाऊ दिलं.याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, लग्न समारंभात वाद झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले होते. दोन्ही पक्षांमध्ये बैठक झाली, मात्र काहीही तोडगा निघू शकला नाही.
हे पण वाचा
- हृदयद्रावक…सात जन्माचं वचन देताना नवरदेवाच्या छातीत कळ आली; लग्नाच्या विधींपूर्वीच वराने घेतला वधूच्या कुशीतच अखेरचा श्वास.
- धक्कादायक! पत्नीचे तिच्या मित्राशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने भररस्त्यावर चाकूने वार करून केली पत्नीची हत्या.
- अमळनेर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार.पोलिसात गुन्हा दाखल.
- शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॉक मध्ये तात्काळ नोंदणी करावी-शेतकरी नेते सुनील देवरे ; महाराष्ट्र शेतकरी संघटना तालुकास्तरावर शिबिर आयोजित करणार
- एरंडोल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित वही तुला