Viral Video: एका रोमँटिक जोडप्याचे भररस्त्यात चालत्या स्कुटीवर अश्लील चाळे; नेटकऱ्यामध्ये संताप पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: काही दिवसांपासून चालत्या बाईक, स्कुटीवर बसून विवाहित जोडपी, प्रेमी युगुले अश्लील कृत्य करीत असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्यात आता पुन्हा एक जोडपे चालत्या स्कुटीवर अश्लील चाळे करतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हे अशा प्रकारचे कृत्य भररस्त्यात करणे आक्षेपार्ह आहे. तरीही कसलीही लाज न बाळगता, जोडपी ते करताना दिसतात. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघनही करीत आहेत. सध्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे; जो आता चर्चेचा विषय बनला आहे.

व्हिडीओमध्ये काय दिसले?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, तीन लोक एका स्कुटीने रस्त्यावरून जात आहेत. यावेळी पुढे बसलेली व्यक्ती स्कुटी चालवतेय. त्याच्या मागे एक पुरुष उलटा बसला आहे आणि त्याच्यासमोर एक महिला बसलेली आहे. पण, अशा प्रकारे एकाच वेळी तिघे स्कुटीवर बसून प्रवास करीत ट्रॅफिकचे नियम मोडत आहेत. यावेळी मधोमध उलटा बसलेला पुरुष भररस्त्यात चालत्या स्कुटीवर महिलेचे चुंबन घेऊन अश्लील कृत्य करीत आहे.

त्याला अजिबात कसलीही पर्वा नाही की, रस्त्यावर इतर लोक आहेत आणि त्यांच्याबरोबर लहान मुले असू शकता. ते फक्त त्यांच्या कृतीमध्येच व्यग्र आहेत. हे दोघे असे कृत्य करीत असताना मागून कोणीतरी त्यांचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ @HasnaZaruriHai नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, या प्रेमाला काय नाव द्यावे? दुसऱ्या युजरने लिहिले, Amazing show.

हे पण वाचा

टीम झुंजार