पाल येथे सर्व रोग तपासणी शिबीरास प्रारंभ

Spread the love

रावेर प्रतिनिधी l संतोष राठोड
पाल. ता रावेर वार्ताहर दि 19/3/2024रोजी येथील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय अरोग्य अभियान व जिल्हा रूग्णालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य आरोग्य सोसायटी महाराष्ट्र शासन अंतर्गत आदिवासी व ग्रामीण भागातील जनतेसाठी मोफत सर्वरोग निदान दंत व शस्त्रक्रिया शिबीर पाल येथे आयोजीत करण्यात आले आहे.

पाल ग्रामीण रूग्णालय येथे रूग्णांची तपासणी शिबीराला सुरूवात झाली असून पहिल्या दिवशी दिव्य चैतन्य महाराज, शिव चैतन्य महाराज, सातपुडा विकास मंडळाचे सचिव धनंजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते कामील तडवी, रतनसिंग बारेला यांच्यासह दोन आदिवासी महिलांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून सुरूवात करण्यात आली.

रुग्ण तपासणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दिपक जाधव, ता.वै.अ. डॉ. अजय रिंधे, वै. अधिक्षक डॉ. स्वप्निल कळसकर, डॉ. रूपाली कळसकर, डॉ. मोनिका देसाई, दौलत निमसे, सलिम तडवी, उमर तडवी, डॉ. प्रद्युम्य महाजन, डॉ. करण कोरवार, डॉ. मयुर पाटील यांच्यासह जळगाव सामान्य रूग्णालय येथील डॉक्टर्स रूग्ण तपासणीसाठी उपस्थित होते.

रूग्ण तपासणीसाठी अधिपरिचारीका रिता धांडे, शितल चिंचखेडेकर, चंद्रकांत लिगळे, सुरभी वांगीकर, आशिष लांजेवार, मनोज इंगळे, संदिप कोळी, विश्वास राव, आसिफ तडवी, मेघराज शेगावकर, नयना कोळी, फिरोज तडवी, एस. जे. चौधरी, जगदीश लवटे, विक्रम चव्हाण, विशाल दाभाडे यांच्यासह सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक नगरे यांनी तर आभार दौलत निमसे यांनी मानले.

हे पण वाचा

टीम झुंजार