सख्खी बहीण व मेहुण्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या २७ वर्षीय तरुणाशी लावून दिलं लग्न, मुलीनेच केला पोलिसांना फोन अन् मग………

Spread the love

चाळीसगाव :- सख्खी बहीण व मेहुण्याने आपल्या मनाविरुद्ध २७ वर्षीय तरुणाशी लग्न लावून दिल्याची माहिती १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने डायल ११२ वर पोलिसांना दिल्यानंतर बालविवाह केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनीच पुढाकार घेत चौघांविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून,सख्खी बहीण, मेहुणा, पतीसह सासूला अटक केली आहे.

चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात १७ मार्च रोजी डायल ११२ वर १४ वर्षीय मुलीने तिच्या मनाविरुद्ध तिची मोठी बहीण व मेहुणा (रा. घाटरोड परिसर, चाळीसगाव) यांनी शिरसगाव (ता. चाळीसगाव) येथील एकाशी बालविवाह लावून दिला, अशी तक्रार केली. चाळीसगाव पोलिसांनी या घटनेची माहिती मेहुणबारे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या पीडितेला पोलिस ठाण्यात आणले.या मुलीचे तिची बहीण सुप्रिया व मेहुणा जयेश भरत भोई यांनी तिच्या संमतीविना तिचा विवाह बळजबरीने शिरसगाव येथील अनिल राजेंद्र चव्हाण (वय २७) ना याच्याशी २५ फेब्रुवारी रोजी गुपचूप माव पद्धतीने लावून दिल.

त्यानंतर पीडित नग मुलगी बहिणीकडे चाळीसगाव येथे आली, पती व सासू तिला बळजबरीने सासरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होते.

पोलिसांचा पुढाकार, पॉस्को तसेच अन्य कलमान्वये गुन्हा…

• अल्पवयीन मुलीचा गुपचूप बालविवाह लावण्यात आला. पीडितेने डायल ११२ वर माहिती दिली असता याप्रकरणी पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत चौघांविरुद्ध पॉस्को तसेच अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. महिला पोलिस कर्मचारी यात फिर्यादी आहेत.

कविता नेरकर, अपर पोलिस अधीक्षक, चाळीसगाव

हे पण वाचा

टीम झुंजार