VIDEO: लिफ्टमध्ये जात असाल तर सावधानता बाळगण्याची गरज, नाही तर,तुमच्यासोबतही लिफ्टमध्ये अस घडू शकते पहा व्हिडिओ.

Spread the love

VIDEO नवी दिल्ली : लोक दैनंदिन आयुष्यात लिफ्टचा वापर करतात. अनेकदा लिफ्टमध्ये धक्कादायक, भयानक घटना घडत असतात. कधी लिफ्ट मध्यभागीच अडकते, कधी लिफ्टच्या दरवाजात कोणी अडकतं, अशा अपघाताच्या घटना सतत समोर येत असतात. दरम्यान, लिफ्टमध्ये लोक अशा प्रकारे चोरी करतात. त्यामुळे आपल्या आजुबाजूच्या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. मात्र सध्या समोर आलेली घटना पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

त्यामुळे तुम्हीही लिफ्टमध्ये जात असाल तर सावधानता बाळगण्याची गरज आहे.लिफ्टमध्ये लोकांना जाणूनबुजून बेशुद्ध झाल्याची घटना तुम्ही कधी ऐकलीय का? लिफ्टमध्ये कोणाला जाणून बेशुद्ध होऊ शकते असा विचारच एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर अशा एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय. पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही.समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लिफ्टमध्ये एक महिला मास्क लावून आहे. त्यानंतर आणखी एक महिला लिफ्टमध्ये चढते.

त्यानंतर मास्क लावलेली महिला रुमाल घेऊन दुसऱ्या महिलेला बेशुद्ध करते. मग ती त्या महिलेकडील सर्व सामान घेऊन पळून जाते. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.@sanjayjourno नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 1 मिनिट 14 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून अशा प्रकरणांमुळे लोकांच्या मनात भीती बसते.

हे पण वाचा

टीम झुंजार