खळबळजनक! धरणगावत क्लास हुन परत येत असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा प्रयत्न, गुन्हा दाखल

Spread the love

धरणगाव: शहरातील राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गांधीमळा परिसरातून दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांकडून अपहरण करण्याचा प्रयत्न समोर आला आहे. या घडलेल्या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, ही घटना मंगळवारी १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता समोर आला आहे. यासंदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळलेल्या माहितीनुसार,जळगाव शहरातील चिंतामण मोरया नगर परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे.

ती इयत्ता नववीचे शिक्षण घेत आहे. १९ मार्च रोजी सकाळी ७ वाजता पीडित मुलगी ही क्लासला गेली होती. सकाळी १० वाजता क्लास सुटल्यानंतर ती घरी येत असतांना शहरातील गांधी मळा येथे विना क्रमांकाच्या पल्सर गाडीवर अज्ञात दोन जण आले, त्यांनी तोंडावर रुमाल बांधलेला होता, त्यांनी पीडित मुलीला पत्ता विचारण्याचा बहाणा करून दोघांनी पीडित मुलीच्या तोंडाला रुमाल बांधून तिचे दप्तर फेकून दिले व तिला दुचाकीवर बळजबरी बसवून घेऊन गेले.

दरम्यान पिडीत मुलीने माझे काका पोलीस आहे असे सांगितल्यामुळे दोन्ही अज्ञात व्यक्तींनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कमानीजवळ जवळ तिला खाली उतरून ढकलून दिले आणि जळगावच्या दिशेने पसार झाले.दरम्यान पीडित मुलगी ही पळत पळत धरणगाव रेल्वे स्टेशनच्या कॉटरजवळ आली होती. पिडीत मुलीचे काका आणि इतर नातेवाईकांना ही बाब लक्षात आल्यांनतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिडीत मुलीने हा प्रकार तिचे काका आणि नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर पीडित मुलीसह तिचे काका यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.त्यानुसार मंगळवारी १९ मार्च रोजी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि जीभाऊ पाटील हे करीत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार