हृदयद्रावक घटना! शेतात सतत नापिकी,पाणी टंचाई, कर्जाचे ओझे कसे फेडायचे या विवचणेत पती-पत्नीने संपविली जीवन यात्रा.

Spread the love

जालना:- जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील बन टाकळी शिवारातील गट नंबर पाच मधील शेतामध्ये नापिकी, कर्जाचे ओझे, पाणी टंचाई, यांना कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून एका शेतकरी दापत्याने आपली जीवन यात्रा संपवली.गावात तीव्र पाणी टंचाई असून गावात सध्या दोन टँकर येतात. पिण्यासाठी गावकरी भटकंती करावी लागत आहे. हृदयद्रावक अशी ही घटना बुधवार 20 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता उघड झाली.

मयत अशोक नानासाहेब कानकाटे (44) व संगीता अशोक कानकाटे (40) रा. बनटाकळी असे मयत दांपत्याचे नाव आहे.त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा आणि वडील, दोन भाऊ आहेत. मुलगा मुंबई येथे शिक्षण घेण्यासाठी परवा गेला होता.मयत अशोक अंबड ते बन टाकळी या मार्गांवर रिक्षा चालवून कुटुंबाचा उदर निर्वाह चालवत असे. मयत अशोकच्या एका मुलीचे लग्न मागील वर्षी झाले असून तिचे लग्नाचे कर्जही देणे बाकी असल्याचे, तसेच काही बचत गटाचे कर्ज त्यांच्याकडे होते. तीन एकर शेती मध्ये विहीर आणि बोरवेल आहे.

दीड एकर मोसंबी असून कापशी पिक हातचे गेले आहे. आता मोसंबीला देण्यासाठी पाणी नसल्याने लोकांचे देणे कसे फेडायचे? या विवंचनेत ते होते असे नातेवाईकाने सांगितले.अंबड शहरापासून जवळच असलेल्या बनटाकळी येथील गट नं 5 मध्ये मयत अशोक यांच्या सकाळी आल्या होत्या. शेतामध्ये नातेवाईकांना दोघांचे मृतदेह आढळल्याने गावकर्‍यांनी शेतात धाव घेतली. गावभर एकच खळबळ उडाली असून गावात स्मशान शांतता पसरली. मृतदेह अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले आहेत.

शेतमजूर असलेल्या दांपत्याने आर्थिक अडचणीला कंटाळून विषारी औषध प्राशन केल्याचे नातेवाईकांनी सांगितले सांगण्यात आले. नातेवाईकांनी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. अंबड पोलीस ठाण्यात आकस्मृत मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो हे कॉ. चव्हाण हे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार