पारोळा तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार, पीडित मुलगी गर्भवती गुन्हा दाखल.

Spread the love

पारोळा: – लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर येत आहे. अशीच एक घटना पारोळा तालुक्यातून समोर आली. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. नाना बारकू सोनवणे याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी ही गर्भवती राहिली.हा धक्कादायक प्रकार उघडकीला आल्यानंतर पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी नाना सोनवणे याच्यावर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करीत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार