उज्जैन(मध्य प्रदेश):- तील मध्ये माणुसकीला काळिमा फासणारा एक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहित महिलेवर प्रेम केल्याबद्दल एका तरुणाला समाजातील लोकांनी भयंकर शिक्षा दिली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मात्र, या व्हिडिओबाबत चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पीडित व्यक्तीशी बोलल्यानंतरच त्यात किती आरोपी होते हे समजेल, असं पोलिसांनी म्हटलंय.टीव्ही 9’नं त्या बाबत वृत्त दिलं आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका तरुणाला समाजातील काही लोकांनी जबर शिक्षा दिली. एका विवाहित स्त्रीवर प्रेम करणं हे त्या शिक्षेमागचं कारण होतं.
ती महिला स्वतःच्या दोन मुलांना सोडून त्या तरुणाबरोबर पळून गेली होती. यामुळे चिडलेल्या सासरच्या लोकांनी त्यांना शोधून काढून मारहाण केली.घट्टिया भागातील बंजारा समाजाच्या एका तरुणाचं भाटपचलाना भागातील विवाहित महिलेवर प्रेम होतं. महिलेनंही या प्रेमासाठी स्वतःच्या दोन मुलांना सोडून त्याच्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. ते दोघं राजस्थानमध्ये पळून गेले, मात्र रागावलेल्या सासरच्या लोकांनी त्यांना शोधून काढलं व परत गावी आणलं. आधी दोघांनाही मारहाण केली. त्यानंतर तरुणाला झाडाला बांधलं आणि भयंकर शिक्षा दिली. तरुणाला झाडाला बांधून चप्पलांची माळ त्याच्या गळ्यात घालण्यात आली.
त्याच्या डोकं भादरण्यात आलं. तरुणाच्या तोंडात चप्पल-बूट कोंबण्यात आले. यावर कळस म्हणून त्याला लघवी प्यायला लावली. सासरच्या लोकांसोबत आसपासच्या लोकांनीही या कामात साथ दिली. या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्यात आला.उज्जैन ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितेश भार्गव यांनी ही घटना तीन ते चार दिवसांपूर्वीची असल्याचं म्हटलंय. तसंच व्हिडिओची सत्यता पडताळल्यावर आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल असंही त्यांनी सांगितलंय. आरोपी कोण आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत.
मात्र या प्रकरणाबाबत अजून कोणतीही तक्रार दाखल झाली नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत तरुणाचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचं दिसतंय. त्याला शिव्या देऊन डोक्यावर बूट ठेवण्यात आले. त्याची अर्धी मिशी कापण्यात आली. ज्या महिलेवर त्याचं प्रेम होतं, तिलाही तरुणाला मारायला लावण्यात आलं. हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. सोशल मीडियावर अनेकजण या घटनेचा निषेध करत आहेत. एकाच समाजातील हे प्रकरण असल्यानं त्याबद्दल अजून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. घटनास्थळावरून पोलीस या घटनेविषयी माहिती घेत आहेत. त्यानंतर कायदा मोडणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.
हे पण वाचा
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.