चारित्र्याच्या संशयावरून दारुच्या नशेत पतीने पत्नीसह दोन मुलींना घरात कोंडून लावले कुलूप,पेट्रोल टाकून लावलीआग,तिघींचा मृत्यू

Spread the love

अहमदनगर :- शहरापासून जवळच असलेल्या पिंपळगाव लांडगा येथे धुलिवंदनच्या दिवशीच पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून दारुच्या नशेत पतीने हे कृत्य केले आहे. कृत्यामुळे नगरसह परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.सुनील लांडगे असे आरोपी पतीचे नाव असून त्याने आपली पत्नी लीला आणि दोन मुलींना घरात कोंडले. त्यानंतर बाहेरून कुलूप लावून घरामध्ये पेट्रोल टाकत आग लावून पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारले आहे. हा सर्व प्रकार सुनील याने पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून केल्याची माहिती समोर आली आहे.दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केले. या घटनेत पत्नी लिलाबाई (२६), मुलगी साक्षी (१४), खुशी (९ महिने) या तिघींचा जळून मृत्यू झाला.

पत्नी आणि दोन मुलींचा होरपळून मृत्यू

आग लागल्याची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी सुनील याच्या घराकडे धाव घेतली. मात्र घराला कुलूप लावलेले असल्यामुळे त्यांना काही मदत करता आली नाही आणि घरामध्ये कोंडून टाकलेल्या पत्नी आणि मुलींचा जागीच होरपळून मृत्यू झाला. जे घर पेटवून दिले ते पत्र्याचे होते. ते जळून खाक झाले. आधीच उन्हाचा तडाखा व भडकलेली आग, तापलेले पत्रे अद्याप मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले मात्र दुपारपर्यंत हे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.

पतीने दिली गुन्ह्याची कबुली

या दरम्यान या घटनेमुळे पिंपळगाव सह नगर तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना समजतात गावातील लोक आणि पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. सुनील लांडगे हा त्याच परिसरात दारूच्या नशेत आढळून आला. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून याने केलेल्या कृत्याची लगेचच पोलिसांना कबुली दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार