दिल्ली :- पूर्व दिल्लीतून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कोचिंग सेंटरमध्ये चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाला आहे. आरोपी नराधम ट्युशन देणाऱ्या शिक्षिकेचा भाऊ असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.या धक्कादायक घटनेनतंर चिमुकलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. शेकडोच्या संख्येने आरोपीच्या घराबाहेर जमले, गाडीची तोडफोड केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पूर्व दिल्लीतील पांडव नगरमध्ये घडली. याच परिसरात राहणारी एक मुलगी लहान मुलांची ट्युशन घ्यायची. तिच्या ट्युशनमध्ये चार वर्षांची पीडित चिमुकली यायची. काल (दि.23) ट्युशन देणारी मुलगी घरात हजर नसताना 34 वर्षीय आरोपीने त्या निष्पाप मुलीला शिकवण्याच्या बहाण्याने घरात घेतले आणि तिच्यावर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली.
घटनेनंतर मुलगी रडत-रडत घरी पोहोचली. तिच्या घरच्यांनी तिला रडण्याचे कारण विचारले असता ती आणखीनच रडू लागली. पालकांनी तिची समजूनत काढली आणि तिला जवळ घेऊन विचारले असता, तिने तिच्यावर घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. यानंतर पालकांनी मुलीला घेऊन थेट मांडवली पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. दुसरीकडे चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे.
आज सकाळपासून नागरिक रस्त्यावर उतरले असून, आरोपीवर कडक कारवाईची मागणी करत आहेत. यावेळी संतप्त नागरिकांनी आरोपीची कारही फोडली. सध्या मुलीला उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी उप-राज्यपालांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.