रायगढ (छत्तीसगड): लग्नबाह्य प्रेमसंबंधांतून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होतेय. एका मुलाने तर चक्क आईचं बाहेर प्रेमप्रकरण सुरू आहे कळल्यावर असं काही केलं की, त्याच्या कारनाम्याने संपूर्ण राज्य हादरलं.या घटनेनंतर मुलानेही थेट दुसऱ्या राज्यात पळ काढला, परंतु तिथून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आपल्या आईचे बाहेर प्रेमसंबंध सुरू आहेत, ही बाब या मुलाला पटलीच नाही. त्यात त्यानं आई आणि तिच्या प्रियकराला एकत्र पाहिलं होतं, त्यामुळे त्याच्या तळपायातली आग मस्तकात गेली.
दोघांचं प्रेम जसजसं खुलत होतं तसतसं त्याला जगणं नकोसं झालं होतं.प्रकरण आहे छत्तीसगडच्या रायगढ जिल्ह्यातलं. इथला दुकानदार अभिषेक केशरवानी याचे निखिल बरेठ याच्या आईशी प्रेमसंबंध होते. दोघं गावातच चोरून एकमेकांना भेटायचे. दिवसेंदिवस त्यांच्या प्रेमाला उधाण आलं होतं. एक दिवस अचानक याबाबत निखिलला कळलं. 15 मार्च रोजी त्याची आई अभिषेकला भेटायला गेलेली असताना त्याने दोघांना एकत्र पाहिलं.
कदाचित बोलून या प्रकरणावर काहीतरी मार्ग निघाला असता, परंतु निखिलनं हे संपूर्ण प्रकरण मूळापासून संपवायचा निर्णय घेतला. त्याने अभिषेकची पूर्ण माहिती काढली आणि त्याच्या दुकानाजवळ त्याची वाट पाहत थांबला. अभिषेक तिथं येताच निखिलनं ‘तुमच्याशी थोडं बोलायचं’, असं म्हणून त्याला थांबवलं.’ ‘काय झालं बेटा’, असं म्हणून अभिषेकही उत्सुकतेने थांबला. तेवढ्यात निखिलनं खिश्यातून धारदार सुरा काढला आणि अभिषेकला काही कळायच्या आतच त्याच्या छातीवर, पोटावर सपासप 6 वार केले.
अभिषेक जागच्या जागी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याचा तिथंच मृत्यू झाला.या घटनेनंतर निखिलनं तिथून पळ काढला. रायपूरहून ट्रेन पकडून तो थेट कर्नाटकात पोहोचला. पोलीस तपासात अभिषेकचा खून त्याच्या प्रेयसीच्या मुलानं केल्याचं आढळल्यानंतर पोलिसांनी कर्नाटकात जाऊन निखिलला बेड्या ठोकल्या आणि त्याला तुरुंगात धाडलं.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.