फेसबुकवर महिलेशी झाली मैत्री,भेटण्यासाठी बोलावून तिच्या सोबत काढले फोटो, व्हायरल करून बदनामी धमकी देत उकळले 34 तोळे सोन्याचे दागिने.

Spread the love

पुणे :- फेसबुकवर ओळख झाल्यानंतर महिलेला भेटण्यासाठी बोलावून तिच्या सोबत फोटो काढले. त्यानंतर फोटो व्हयरल करुन बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन 34 तोळे वजानाचे दागिने घेणाऱ्या आरोपीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार एप्रिल 2023 ते 22 मार्च 2024 या कालावधीत आकुर्डी आणि वेगवेगळ्या ठिकाणी घडला आहे.

याबाबत पीडित महिलेने शनिवारी (दि.23) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुरज लक्ष्मण परमार उर्फ सुरज जैन (वय-28 सध्या रा. संकेत पार्क, सय्यदनगर, पुणे मुळ रा. महाविर कॉलनी, विजापुर, कर्नाटक) याच्यावर आयपीसी 384, 386, 500, 501, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची आणि आरोपीची ओळख फेसबुकवर झाली. आरोपी हर्बल लाइफ प्रोडक्ट चा व्यवसाय करतो. या व्यवसायाच्या निमित्ताने महिलेला भेटून आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर महिलेला भेटायला बोलावून घेत दोघांचे एकत्र फोटो काढले. काही दिवसांनी आरोपीने दोघांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच महिलेच्या पतीला मारण्याची धमकी देऊन 34 तोळे सोन्याचे दागिने घेतले.फिर्यादी यांनी दागिने परत मागितले असता दागिने देण्यास नकार दिला. तसेच महिलेला धमकावून तिच्या फेसबुकचा पासवर्ड घेतला. पासवर्डचा वापर करुन आरोपीने त्याच्या मोबाईलमध्ये महिलेचे फेसबुक अकाउंट उघडले. या अकाउंटवर दोघांचे एकत्र असलेले फोटो पोस्ट करुन महिलेची बदनामी केली. महिलेने तक्रार देताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार