हातकणंगले :- येथे तीन दिवसांपूर्वी भाड्याच्या घरात राहायला आलेल्या रूपाली दादासो गावडे (वय २८, रा. हिंगणगाव, ता. हातकणंगले) हिचा अनैतिक संबंधातून मंगळवारी सकाळी तिच्या प्रियकराने दोरीने गळा आवळून खून केला.या खुनातील फरार संशयित आरोपी प्रकाश शेखर हदिमणी (वय ३५, रा. हिंगणगाव) यास अवघ्या आठ तासात एलसीबीच्या पथकाने अटक केली. खूनप्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लक्ष्मी औद्योगिक वसाहत रोडला राजदीप खोत यांच्या मालकीच्या भाड्याच्या खोलीत प्रकाश हदिमणी आणि रूपाली गावडे तीन दिवसांपूर्वी राहायला आले होते.
रूपाली आणि प्रकाश यांचे प्रेमसंबंध होते. ते दोन-तीन वर्षे हिंगणगाव सोडून बाहेर राहात होते. दोघेही विवाहित आहेत. रूपाली हिचा घटस्फोट झाला असून, तिला दोन मुले आहेत. तिचे माहेर बागणी (ता. वाळवा) आहे. ती प्रकाशसोबत गेली तीन वर्षे राहात होती. दोघेही लक्ष्मी औद्योगिक वसाहत येथे काम करत होते. प्रकाशला दारूचे व्यसन होते. या कारणाने दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते.मंगळवारी सकाळी दोघांमध्ये भांडण झाल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. या रागातून प्रकाशने रूपालीचा गळा दोरीने आवळून खून केला.
माहिती मिळाल्यानंतर हातकणंगले पोलिस ठाण्याचे पो. हे. कॉ. महादेव खेडकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. रूपालीच्या मोबाइल डिटेल्सवरून पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला होता.एलसीबीच्या पथकाने अवघ्या आठ तासात संशयित प्रकाश हदिमणी यास हातकणंगले -पेठ वडगाव रस्त्यावरील आळते परिसरातून ताब्यात घेतले. खुनाचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. पोलिस निरिक्षक अशोक सायकर तपास करत आहेत.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ