ब्रेकिंग न्यूज : सावद्यात ४० वर्षीय इसमाची दगडाने ठेचून निघृण हत्या

Spread the love

सावदा, ता. रावेर.(प्रशांत सरवदे) सावदा :- येथे दिं 29/03/2024 रोजी रात्री दगडाने ठेचून हत्या सावदा येथे कोचुर रोडवरील रस्त्याला लागून येत असलेल्या शेतातील खोलीत एका पुरुषाची दगडाने ठेचून हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रावेर तालुक्यातील सावदा येथे कोचुर रोडवर असलेल्या रविंद्र बेंडाळे यांच्या शेतात रखवालदार असलेल्या शोभाराम रीचू बारेला उर्फ सुरमा भोपाली. वय ४० वर्षे. मूळ राहणार मध्यप्रदेश. याचा शेतात बांधलेल्या खोलीत रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने तोंडावर दगडाने ठेचून हत्या केली.

तसेच त्याच्या छातीवर भाला मोठा दगडही ठेवला आहे. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हत्या कोणी केली?का केली. या बाबत अद्याप काहीही स्पस्ट झालेले नाही, तपासासाठी जळगाव येथून श्वान पथक मागविण्यात आले असून पुढील तपास सावदा पोलीसस्टेशनचे सपोनी जालिंदर पळे, देवा पाटील, यशवंत खेळकर व सहकारी करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार