नोकरी विषयक:- बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. भारतीय स्टेट बँकेत बंपर भरती करण्यात येणार आहे. भारतीय स्टेट बँकेत 7000 हून अधिक पदांवर बंपर भरती करण्यात येईल.
या भरती संदर्भातील अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच ही भरती जाहीर होण्याची शक्यता आहे. या स्टेट बँकेच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना एप्रिल महिन्यात जारी होण्याची शक्यता आहे. तर अंदाजानुसार, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख मे महिन्यापर्यंत असेल, असा अंदाज आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला (SBI Recruitment 2024 Apply Online) भेट देऊ शकता.
SBI Recruitment 2024 Apply Online & Last Date
- रिक्त पदे : विशेष अधिकारी, लिपिक आणि इतर पदे
- रिक्त पदांची संख्या : 7000 हून अधिक
- अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : एप्रिल महिन्यात अधिसूचना जारी होऊ शकते.
वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे असणे आवश्यक आहे आणि कमाल वय 28 वर्षे असणे आवश्यक आहे. विविध पदांसाठीची वयोमर्यादा वेगवेगळी असू शकते.
SBI Clerk Salary : लिपिक पगार
एसबीआय लिपिक पदावर निवड झालेल्या उमेदवाराला मूळ वेतन 19900 रुपये आहे, तर महिन्याच्या शेवटी भत्ते आणि भत्ते मिळून त्याला 29000 ते 30000 रुपये पगार मिळतो.
SBI Junior Associate Education Qualification : शैक्षणिक पात्रता
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदासाठी पात्र उमेदवाराला हिंदी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये टायपिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.भारतातील कोणत्याही विद्यापीठातून बॅचलर पदवी
SBI Clerk Vacancy 2024 Selection Process : निवड प्रक्रिया कशी असेल?भारतीय स्टेट बँकेत भरतीसाठी उमेदवारांची प्राथमिक परीक्षा घेतली जाईल.स्टेट बँकेत भरतीसाठी परीक्षा स्थानिक भाषा आणि इंग्रजी भाषेत घेतली जाईल.पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल.पूर्वपरीक्षा एकूण 100 गुणांसाठी घेतली जाते, ज्यामध्ये 3 विभाग असतात.भरतीची अधिसूचना जाहीर झाल्यावर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होण्याची तारीख, अंतिम तारीख आणि परीक्षेची तारीख जाहीर होईल.
SBI Recruitment 2024 : अर्ज फी
- जनरल/ओबीसी (GEN/OBC) – 750 रुपये
- SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असेल.
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






