नांदेड :- नरसीफाटजवळ धक्कादायक घटना घडली आहे. पतीचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच पत्नीला दुःख असह्य झाले. पतीच्या मृत्यूचे दुःख आणि निराशेच्या भरात तिने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले आहे.ही घटना शनिवारी रात्री बेंद्री (ता.नायगाव) येथे घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.बेंद्री येथील अरुण बाबुराव बेंद्रीकर हे विष्णुपुरी (नांदेड ) येथील महावितरण कार्यालयात नोकरीला होते. काम संपल्यावर शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीने आपल्या गावी बेंद्रीकडे परतत होते.
गावाजवळ मांजरम कॉर्नर येथे त्यांच्या दुचाकीला दुसऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात अरुण गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने नांदेडला नेण्यात आले. मात्र, गंभीर जखमी असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.पतीच्या अपघाताचे वृत्त कळताच अरुण यांची पत्नी स्नेहा कुटुंबियांसह पतीला भेटण्यासाठी नांदेडच्या रुग्णालयात आली होती. अरुण यांच्यावर उपचार सुरु असल्याचे त्यांना सांगण्यात आले. नातेवाईकांनी त्यांची समजूत काढत त्यांना बेंद्री येथील घरी पाठवले.
मात्र, अपघातात पतीचा मृत्यू झाल्याची कुणकुण स्नेहा यांना लागली होती. हे दुःख त्यांना सहन झाले नाही. या घटनेच्या त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. या दुःखाच्या आणि निराशेच्या भरात त्यांनी मध्यरात्री घरातील एका खोलीत गळफास घेत जीवनयात्रा सपंवली.स्नेहा यांनी आत्महत्या केल्याचे समजताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला. काही वेळापूर्वीच पतीचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर काही तासातच पत्नीने गळफास घेत आयुष्य संपविले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण बेंद्री गावात शोककळा पसरली आहे. मृत अरुण व स्नेहा यांना तीन वर्षाचे एक अपत्य असून आई, वडील, दोन भाऊ असा परिवार त्यांच्या पश्चात आहे.
हे पण वाचा
- मतदार संघातील जनतेचे भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ :-डॉ.संभाजीराजे पाटील
- धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ;म्हसावद व बोरणार येथे ऊ.बा. ठा. गटाला मोठा धक्का
- गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त “मतेशी जीकान लायर “- बंजारा तांडा वासियांचा निर्धार !
- भीषण अपघात! बस दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू; प्रवाशांनी खिडकीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला, पण…’ पहा व्हिडिओ
- गुलाब भाऊंचा विजयच आमच्यासाठी खऱ्या भाऊबीजेची भेट’! विदगाव – फुपणी परिसरातील लाडक्या बहिणींचे भावनोद्गार !