यावल : तालुक्यातील डांभुर्णी या गावात २५ वर्षीय विवाहितेचा गावातीलच एकाने विनयभंग केला. सदर महिला भांडे धूत असतांना तो तिच्या जवळ गेला व तिच्याशी गैरवर्तन करीत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मंगळवारी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डांभुर्णी ता. यावल या गावात सोमवारी २५ वर्षीय महिला आपल्या घराच्या बाहेर भांडे धूत होती.
तेव्हा तेथे प्रवीण काशिनाथ कोळी हा गेला आणि या महिलेला सांगितले की मी तुला पाच हजार रुपये देतो तू माझ्यासोबत चल असे सांगत महिलेच्या एकांतपणाचा भंग करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला व तिचे पती यांना शिवीगाळ करून धमकी दिली. तेव्हा याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात प्रवीण कोळी याच्याविरुद्ध विनयभंग सह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.