जळगाव :- येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या (नर्सिंग) प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे.करुणा संतोष बोदडे हिने राहत्या खोलीमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. मैत्रिणी गावाकडे गेलेल्या असल्याने ती खोलीत एकटीच होती. याचवेळी करुणाने हा टोकाचा निर्णय घेतला. ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.करुणा अन्य तीन मैत्रिणींसह दीक्षितवाडीमधील वानखेडे इमारतीमध्ये भाडे तत्वावरील खोलीत राहत होती.
यामधील तीन विद्यार्थिनी सुट्टी असल्याने गावाकडे गेल्या होत्या. अशात खोलीवर एकटीच असलेल्या करुणाने रविवारी संध्याकाळी गळफास घेत जीवन संपवलं. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.करुणा हिचा चार महिन्यांपूर्वीच सुरत येथील होमगार्ड तरुणासोबत साखरपुडा झाला होता. मात्र, लग्नाआधीच तिने अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला असून एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तरुणीची मित्रांनीच केली हत्या
पुण्यातूनही नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा खून करून तिचा मृतदेह जाळल्यानंतर पुरण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलीय. भाग्यश्री सुडे या तरुणीचं तिच्याच मित्रांनी अपहरण केलं. त्यानंतर तरुणीच्या घरच्यांकडे खंडणी मागितली. त्यानंतर आपण पकडले जाऊ या भितीने तरुणीचा खून केला. याप्रकरणी शिवम फुलवाळे, सागर जाधव आणि सुरेश इंदूरे या तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ