CCTV Video: सोशल मीडियावर दररोज अनेक वाहन अपघांताचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत असतात. अनेकवेळा या अपघातात संपूर्ण कुंटूब मरण पावतात. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत जो व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर देव तारी त्याला कोण मारी ही म्हणीची प्रचिती पुन्हा एकदा दिसून आली असे म्हणता येईल.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एक वृद्ध व्यक्ती घराबाहेर असलेल्या रस्त्याच्या कडेला बसलेला दिसून येत आहे.
तेवढ्यातच रस्त्यावरु एक कार भरधाव वेगात येत असते मात्र भरधाव वेगात येणाऱ्या कारचे नियंत्रण बिघडते आणि ती त्या रस्त्याच्या कडेला बसलेल्या वृद्ध व्यक्तीच्या दिशेने जाते. नशीब चांगले म्हणून वृद्ध व्यक्तीचे लक्ष त्या कारकडे जाते आणि क्षणाचा विलंब न करता तेथून ते उठून भिंतीपाठी जातात. यामुळे त्यांच्या जीव थोडक्यासाठी वाचला जातो. सर्व थरारक घटना घराबाहेरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकले नाही.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @gharkekalesh या अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला असून व्हिडिओवर यूजर्संच्या विविध कमेंट्स येत आहेत.त्याताली एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,’ नशीब चांगले म्हणून थोडक्यात बचावले’तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,’वृद्धाद(Old man)ची वेळ चांगली होती’.तसेच व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






