अलवर (राज):- आजकाल सर्वांनाच रील्स बनवायला, पाहायला आवडतं. आपल्याला रील आवडलं तर आपण ते सेव्ह करतो, लाईक करतो, त्यावर कमेंट करतो मात्र, अशाच एका रीलवरील कमेंटमुळे एक कुटुंब उध्दस्त झाल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अलवरमध्ये पत्नीने रील बनवल्याने नाराज झालेल्या पतीने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली आहे. पतीने अनेकवेळा पत्नीला रील बनवण्यास मनाई केली होती पण ती ऐकत नव्हती.या प्रकरणावरून दोघांमध्ये वाद वाढू लागला. भांडण झाल्यावर पत्नी घर सोडून माहेरी गेली. यावरून घरात वादही सुरू होता. निराश झालेल्या पतीने आत्महत्या केली.
मरण्यापूर्वी पतीने सोशल मीडियावर लाइव्ह जात पत्नीच्या रीलवर अश्लील कमेंट करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच कुटुंबात सुरू असलेल्या वादाची माहिती दिली.रैनी पोलीस स्टेशन हद्दीतील नांगलबास गावात राहणारा सिद्धार्थ हा दौसा येथील आरोग्य विभागात एलडीसी (लोअर डिव्हिजन क्लर्क) म्हणून कार्यरत होता. दीड वर्षांपूर्वी वडिलांच्या जागी त्याला नोकरी लागली. सिद्धार्थचा विवाह माया नावाच्या मुलीशी झाला. सिद्धार्थने ५ एप्रिल रोजी आत्महत्या केली होती. 6 एप्रिल रोजी कुटुंबीयांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.मायाला सोशल मीडियावर रील बनवण्याची आवड होती.
जेव्हा ती रील बनवायची आणि ती इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करायची तेव्हा लोक त्यांच्यावर अश्लील कमेंट करायचे. सिद्धार्थला पत्नीच्या रीलवरील करण्यात आलेल्या अश्लील कमेंट्स अजिबात पटत नव्हत्या. यावरून माया आणि सिद्धार्थमध्ये वाद सुरू झाला. सिद्धार्थ आणि माया यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.सिद्धार्थने मायाला रील बनवण्यास मनाई केली. पण मायाला ते मान्य नव्हते. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढू लागल्यावर माया घर सोडून आई-वडिलांच्या घरी गेली आणि सिद्धार्थवर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली.
सिद्धार्थला दारू पिण्याचे व्यसन जडले असून त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढू लागला असल्याचे सांगितले.आत्महत्या करण्यापूर्वी सिद्धार्थ सोशल मीडियावर लाईव्ह आला यावेळी त्याने त्याच्या पत्नीच्या व्हिडिओवर कमेंट करणाऱ्यांना सुनावलं आहे. जेव्हा तुमच्या घरी असे घडेल तेव्हा तुम्हाला समजेल. सिद्धार्थचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.पोलिस अधीक्षक (एसपी) आनंद शर्मा यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर माध्यमांद्वारे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये या प्रकरणाचा तपास केला जात आहे. याबाबत कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तर मृताची पत्नी आणि मुलांचीही चौकशी करण्यात आली आहे. सोशल मीडियाचे अकाउंटही तपासले जात आहेत.
हे पण वाचा
- धक्कादायक! एका व्यक्तीने आपल्या जिवंत पत्नीला सरकारी कागदपत्रांमध्ये मृत दाखवून प्रेयसीशी केलं लग्न.
- संतापजनक!19 वर्षीय नराधम तरुणाने विवाहित महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी,नकार देताच कटरने केले 15 वार 280 टाके टाकून,गोधडीवानी शिवले पीडितेचे अंग.
- आईनं नशा करण्यासाठी पैसे न दिल्यामुळे २७ वर्षीय उच्चशिक्षित मुलाने १३ दुचाकी पेटवून दिल्या; माथेफिरू नशेखोर मुलास अटक.
- अवैधपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर सावदा पोलिसांच्या छापा, 60 किलो मांस जप्त, एक जणांवर गुन्हा दाखल
- आज रविवार रोजी एरंडोल येथे ‘राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद’चे आयोजन.. राज्यभरातून विविध मान्यवरांची व संविधान प्रेमीची राहणार उपस्थिती.