सारण (बिहार) :- मधील जिल्ह्यातील एका घटनेनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. इथं नवविवाहित महिलेनं लग्न होऊन १ महिना न होताच जे केलं त्यानं सर्वांनाच धक्का बसला. लग्नाच्या २५ व्या दिवशी ती पतीला सोडून प्रियकरासह पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, वाटेत पतीनं तिला गाठलं अन् हे प्रकरण पोलिसांत पोहोचलं. शुक्रवारी संबंधित महिला तिच्या पतीसोबत बाजारात निघाली होती. अशातच तिनं पार्लरला जाते असं सांगून तिथून पळ काढला. खूप वेळ झाल्यानंतरही ती परतली नाही. तितक्यात पतीनं तिला दुसऱ्याच्या गाडीत बसल्याचे पाहून एकच गोंधळ घातला.
मग स्थानिकही त्याच्या मदतीला धावले. दरम्यान, आपल्या पत्नीला अनोळखी व्यक्तीच्या वाहनात पाहून पती घाबरला. त्यानं आरडाओरडा केल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली आणि पोलिसांनाही याची माहिती मिळाली. काही वेळातच पोलीस तिथे पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत नवविवाहित महिला, तिचा पती आणि तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात नेले. नवविवाहितेच्या पतीनं सांगितलं की, त्याचा विवाह ११ मार्च २०२४ रोजी झाला होता. पत्नीनं त्याला दमदाटी करून आपल्या माहेरी जाण्याचा आग्रह धरला होता.
आत्महत्येची दिली धमकी
पत्नीच्या आग्रहास्तव पती तिला घेऊन त्याच्या सासरच्या घरी निघाला होता. मात्र, पत्नीनं प्रियकरासह पळून जाण्याचा कट रचला होता. नवविवाहित महिलेनं पोलिसांना सांगितलं की, माझ्या विरोधाला न जुमानता कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी जबरदस्तीनं माझं लग्न लावून दिलं. मला आजही माझ्या प्रियकरासोबत राहायचं आहे. यानंतरही जबरदस्ती झाली तर मी आत्महत्या करून जीवन संपवेन. पण, मी माझ्या पतीसोबत राहणार नाही. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






