वडील खर्चासाठी मनासारखे पैसे देत म्हणून 16 वर्षाच्या मुलाने सहा लाख रुपयात सुपारी देऊन केली वडिलांची हत्या.

Spread the love

प्रतापगड(उत्तर प्रदेश):- येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांच्या हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाने वडिलांना मारण्यासाठी सुपारी दिली होती. 16 वर्षाच्या मुलाने संतापाच्या भरात वडिलांना संपवण्याची जबाबदारी तिघांकडे दिली होती. यासाठी मुलाने आरोपींना दीड लाख रुपये देखील दिले होते. आरोपींना अटक झाल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत हा सगळा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. 16 वर्षाच्या मुलाने तीन आरोपींना सुपारी देऊन वडिलांची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे हत्येसाठी मुलाने आरोपींना तब्बल सहा लाख रुपये देण्याचे मान्य केलं होतं. हत्येआधी मुलाने आरोपींना दीड लाख रुपये देखील दिले होते. वडील खर्चासाठी हवे तेवढे पैसे देत नव्हते त्यामुळे मुलाने त्यांना संपवण्याची योजना आखल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी हत्या करणाऱ्या आरोपींसह अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पट्टी भागात तीन बाईकस्वार आरोपींनी व्यावसायिक मोहम्मद नईम यांची गोळी मारुन हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी पियुष पाल, शुभम सोनी आणि प्रियांशु यांना अटक केली होती. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितले की, नईम यांच्या हत्येसाठी त्यांच्या मुलाने सुपारी दिली होती.”अल्पवयीन मुलाने आम्हाला सांगितले की, त्याने वडिलांच्या हत्येची योजना आखली होती आणि यासाठी तिघांना सुपारी दिली होती. यासाठी त्यांना सहा लाख रुपये देणार होतो. हत्ये आधी दीड लाख रुपये दिले होते. वडिलांच्या हत्येनंतर उरलेली रक्कम त्यांना देणार होतो,” असे पोलिसांनी सांगितले. खर्चासाठी वडील मनासारखे पैसे देत नव्हते म्हणून मुलगा त्यांच्यावर नाराज होता. आरोपी मुलगा त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दुकानातून पैशांची आणि घरातून दागिन्यांची चोरी करायचा. याआधीदेखील त्याने याच कारणावरुन वडिलांच्या हत्येचा कट रचला होता पण त्यामध्ये त्याला यश आलं नाही,” अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींची रवानगी तुरुंगात केली आहे. तर अल्पवयीन मुलाला बालगृहात पाठवण्यात आले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार