एरंडोल :- शेतात काम करीत असतांना अचानक विज कोसळून पस्तीस वर्षीय युवकाचा वडिलांच्या डोळ्यासमोरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागदुली(ता.एरंडोल) येथे आज दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली.डोळ्यासमोरचतरुण मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहताच वडिलांना मोठा धक्का बसला आहे. याबाबत माहिती अशी,की नागदुली येथील श्रीकांत भिका पाटील (वय-३५) हायुवक त्याचे वडील भिका पाटील व मजुरासह नागदुली शिवारातील गट क्रमांक ५०१मध्ये,हॉटेल राधिकाच्या मागील बाजूस असलेल्या स्वत:च्या शेतात काम करीत होते.
दिवसभर काम केल्यानंतर दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास ते घरीजाण्याच्या तयारीत असतांना अचानक विजांचा कडकडात होऊन वादळी वा-यासहपावसाला सुरुवात झाली.पावसाला सुरुवात झाल्यामुळे श्रीकांत पाटील,त्याचेवडील भिका पाटील व शेतात काम करणारा मजूर शेतातच थांबले.शेतातीलपत्र्याच्या शेड असलेल्या गोठ्याजवळ असलेला गुरांचा चारा झाकत असतांना अचानक त्याठिकाणी असलेल्या निंबाच्या झाडावर वीज कोसळली.त्याठिकाणी कामकरीत असलेल्या श्रीकांत पाटील यांच्या अंगावर देखील वीज कोसळल्या मुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
तर त्याचे वडील व मजूर यातून बचावले.श्रीकांतपाटील त्याचे वडील भिका पाटील आणि मजूर असे तिघेही जण आठ ते दहा फुटअनंतरावरच जवळजवळ काम करीत होते.वीज कोसळल्याचा जोरात आवाज आल्याने भिकापाटील यांनी मुलास आरोळी मारली आणि पाठीमागे वळून पाहिले असता मुलगाश्रीकांत हा चा-यावरच पडला असल्याचे दिसले.वडील भिका पाटील यांच्याडोळ्यासमोरच मुलाच्या अंगावर वीज कोसळल्यामुळे त्यांनी जोरजोरात आरोळ्यामारण्यास सुरुवात केली.भिका पाटील यांनी आरोळ्या मारल्यामुळे आजूबाजूच्याशेतक-यांनी आणि ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली.
ग्रामस्थांनी श्रीकांतपाटील यांना तत्काळ जळगाव येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनीतो मयत झाल्याचे सांगितले.नागदुली येथे वीज पडून युवकाचा मृत्यू झाल्याचीमाहिती समजताच आमदार चिमणराव पाटील यांनी तहसीलदार सुचिता चव्हाण यांना त्वरित घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याच्या सुचना केल्या.तसेच मयताच्याकुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.मयत श्रीकांत पाटील यांचे पच्छात पत्नी,तीन आणि सहा वर्षाच्या दोन मुली,अडीच वर्षाचा एक मुलगा,वृद्ध आईवडील,चार विवाहित बहिणी असा परिवार आहे.सकाळी वडिलांसहशेतात कामासाठी गेलेल्या तरुणाचा वीज पडून अचानक मृत्यू झाल्यामुळे परिवारातील सदस्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.घरातील कर्त्या युवकाचा वीज कोसळून मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.जिल्हापरिषदेचे माजी सदस्य नाना महाजन यांनी शासकीय रुग्णालयात मयताच्या परिवाराची भेट घेवून सांत्वन केले.
हे पण वाचा
- धक्कादायक! एका व्यक्तीने आपल्या जिवंत पत्नीला सरकारी कागदपत्रांमध्ये मृत दाखवून प्रेयसीशी केलं लग्न.
- संतापजनक!19 वर्षीय नराधम तरुणाने विवाहित महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी,नकार देताच कटरने केले 15 वार 280 टाके टाकून,गोधडीवानी शिवले पीडितेचे अंग.
- आईनं नशा करण्यासाठी पैसे न दिल्यामुळे २७ वर्षीय उच्चशिक्षित मुलाने १३ दुचाकी पेटवून दिल्या; माथेफिरू नशेखोर मुलास अटक.
- अवैधपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर सावदा पोलिसांच्या छापा, 60 किलो मांस जप्त, एक जणांवर गुन्हा दाखल
- आज रविवार रोजी एरंडोल येथे ‘राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद’चे आयोजन.. राज्यभरातून विविध मान्यवरांची व संविधान प्रेमीची राहणार उपस्थिती.