लखनऊ : पती आणि पत्नीचं नातं अतिशय खास असतं. दोघंही प्रत्येक सुख-दुःखात एकमेकांना साथ देतात. अनेकदा नवरा बायकोमध्ये वादही होतात. मात्र, ते वाद काही वेळातच मिटतात. काही वेळा मात्र हे वाद अतिशय टोकाला पोहोचतात.असंच एक अजब प्रकरण आता उत्तर प्रदेशातील आग्रामधून समोर आलं आहे. इथे तीन मुलांच्या आईने पतीला न सांगता नसबंदी केली. यानंतर जे घडलं, जे अतिशय विचित्र होतं.हा प्रकार पतीला समजताच त्याने पत्नीला घराबाहेर हाकलून दिलं. त्यानंतर महिलेनं पोलिसांकडे मदत मागितली.
हे प्रकरण समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचलं. तिथे पतीने पत्नीला घराबाहेर काढण्याचं कारण सांगितलं, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. पतीने सांगितलं की त्याला आणखी मुलं हवी आहेत. मात्र, पत्नीने त्याला न सांगता नसबंदी करून केली. समुपदेशन केंद्रातील लोकांनी पती-पत्नीमध्ये समजूत काढली.प्रकरण आग्रा येथील ताजगंज भागातील आहे. इरादत नगर भागात राहणाऱ्या या महिलेचं 2018 मध्ये ताजगंज येथे लग्न झालं होतं. पती तहसीलमध्ये कंत्राटी कर्मचारी आहे. लग्नानंतर दोघांना दोन मुली आणि एक मुलगा झाला. महिलेनं सांगितलं की, तिच्या पतीला आणखी मुलं हवी आहेत.
मात्र, त्यांना आधीच तीन मुलं आहेत. तिला आणखी मुलं नको होती. त्यामुळे तिने नसबंदी केली. हा प्रकार तिने पतीला सांगताच त्याने तिला घरातून हाकलून दिलं.पत्नीने सांगितलं की, ती गेल्या 8 महिन्यांपासून तिच्या माहेरच्या घरी राहत आहे. सुरुवातीला महिलेला वाटलं की तिचा नवरा तिला परत बोलावेल. मात्र तसं न झाल्याने महिलेनं पोलिसांची मदत मागितली. तिथून हे प्रकरण समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचलं. शनिवारी समुपदेशक डॉ.सतीश खिरवार यांनी दोघांनाही समुपदेशनासाठी बोलावलं. इथे समजावून सांगितल्यानंतर दोघांमध्ये समेट झाला.
हे पण वाचा
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.