धक्कादायक! पत्नीच्या मदतीने नवऱ्याने 19 वर्षीय तरुणीवर केला बलात्कार, पती आणि पत्नी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.

Spread the love

पुणे : एका इसमाने आपल्या पत्नीच्या मदतीने 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील कात्रज येथे 3 मार्च रोजी ही घटना घडल्याचे समजते. प्रल्हाद सखाराम साळुंके असे त्या इसमाचे नाव असून प्रल्हादने त्याच्या पत्नीच्या मदतीने पीडित मुलीवर बलात्कार केला.याप्रकरणी शनिवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद साळुंके याच्या पत्नीने तिच्या ओळखीच्या एका 19 वर्षीय मुलीला तिच्या घरी बोलावलं. या महिलेने तरुणीला वडापाव खाण्यासाठी घरी येण्याचा आग्रह केला होता. त्यानंतर पीडित तरुणी ही तिच्या घरी गेली. यानंतर थोड्या वेळ बोलून काही कामाच्या निमित्ताने प्रल्हादची पत्नी महिला घराबाहेर गेली. विशेष म्हणजे घराबाहेर जाण्याच्या बहाण्याने तिने बाहेरून घराची कडी लाऊन घेतली.यानंतर प्रल्हाद साळुंखे याने आपली पत्नी बाहेर गेल्याचे समजताच पीडित तरुणी घरी एकटी असताना तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी तरुणीने याला विरोध केला. तसेच घराबाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता बाहेरून दरवाजा बंद असल्याने तिला बाहेर पडता आले नाही. त्यानंतर तरुणीला धमकावत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. या अत्याचारानंतर पीडित तरुणीने थेट पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी दोन्ही पती आणि पत्नी दोघांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, पुण्यात महिलांवरील बलात्काराच्या घटना वाढल्या आहे. काही दिवसांपूर्वी एका पतीने आपल्या पत्नीची विक्री करून तिच्यावर अत्याचार केले होते. या वाढत्या घटना अद्याप कमी झालेल्या नाहीत. या घटनांवर आळा घालण्यात पोलीस प्रशासन देखील अपयशी ठरल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार